Monday, December 19, 2011

श्रद्धा आणि बुद्धी आणि सहिष्णुता

थोर समाजसुधारक आणि ज्येष्ठ निरुपणकार यांच्या सत्कारप्रसंगी जमलेला दहा लाख अनुयायांचा मेळावा ही तमाम बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकांना, अंधश्रद्धाळू, अज्ञानप्रेमी भाविकांनी मारलेली सणसणीत थप्पड आहे.

If I were not an atheist, I would believe in a God, who would choose to save people on the basis of the totality of their lives and not the pattern of their words. I think he would prefer an honest and righteous atheist to a TV preacher whose evry word is God, God, God, and whose evry deed is foul, foul, foul.

Isaac Asimov
The Times of India 19 Nov 2011

Many thanks, Awdhoot. Mi loksatta gheto ani sakali ghait kuthehi jayacha nasalyamule barach vachato. Pan kahi batamya, features apoap filter hotat tasa ha photo jhala.
Tujhya mailmule lavkarat lavkar Loksatta band karayla mokala! Pan paryay kay? To navtarun, navamatth MaTa? Ki marathi bandach karu? HT pure?


Loksattaa band kelyaane Ganeshmurtechaa chhaap asalela paper ghyaavaa laagel.
Girish Kuberchyaa jaagee mee asato tar malaahee hech karaawe laagale asaate.
Tu lokashaahee maanat asasheel tar andhashraddhaa nirmoolan chalavalee visarjeet kelyaa paahijes,
Majority decides what is right and what is wrong.

Lokshahi mhanaje bahumatachi hukumshahi navhe! Itaranna ija n pohochavata majhya tenets pramane jaganyacha hakk mala ahe. Ani to mi bajavanarach. Udya loksatta band kela tar gupchup karanar nahi. Loksattela reetsar patra pathv in ki andhshraddha jopasun tumache daha vachak vadhat asatil tar mi ek kami honar

प्रिय अवधूत,
काल तुझी मेल वाचून माझा असा गैसमज झाला, की 'सणसणीत थप्पड ...' हे लोकसत्तेचं विधान आहे. त्या गैरसमजाला अनुसरून माझी प्रतिक्रिया झाली. ते विधान लोकसत्तेचं नसून तुझं आहे, हे कळल्यावर मला माझे शब्द मागे घ्यायचे आहेत.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा, यात मला फरक दिसत नाही आणि मी अश्रद्ध, नास्तिक, पाखंडी असलो तरी दुसऱ्या कोणी श्रद्धा बाळगायला माझा अजिबात विरोध नाही. श्रद्धाळू लोकांनी मेळावा भरवला आणि त्यात दहा लाख लोक गोळा झाले आणि माझा विचाराचे दहाच जमणार असतील, तर मला त्यात वैषम्य सुद्धा वाटत नाही. थप्पड वगैरे खाल्यासारखं तर अजिबात नाही. माझं म्हणणं इतकंच आहे की आम्हा दहा लोकांनादेखील सार्वजनिकपणे जमायला आणि विचार मांडायला मुभा असावी.
पुढचं लिहिलं नाही तर मला अप्रामाणिक वाटेल.
माणसाची निर्णयप्रक्रिया गुंतागुंतीची असते. मी माझ्या धारणा बुद्धीमधून ठरवत नाही, असं माझ्या लक्षात आल्यावर मी इतरांचं निरीक्षण केलं आणि मला जाणवलं की जगण्याच्या सर्व व्यवहारांमध्ये मार्गदर्शक ठरणाऱ्या धारणा ठरवताना कोणीच बुद्धी वापरत नाही. 'बुद्धी नाही, तर काय भावना?' हा सवाल उथळ आहे. 'पिंड' नेमका कसा घडतो, त्यात संस्कारांचा, सभोवतालाचा भाग किती आणि व्यक्तीनिष्ठ निवड किती, हे मला माहीत नाही. त्यात आणखीही काही असू शकेल.
आणखी विचार केल्यावर तर मला बुद्धी बेभरवशाची वाटू लागली आहे. बुद्धीला गृहीतं - axioms - लागतात. ते कुठून येतात? शेवटी माझं आकलन असं आहे की, माणूस निर्णय अगोदर घेतो आणि त्या निर्णयाचा समर्थन करण्यासाठी तर्क बुद्धीतून घडवण्याची प्रक्रिया नंतर करतो. म्हणून, माझी बुद्धी जेव्हा काही सांगू लागते, तेव्हा मी सावध होऊन त्याचा उगम शोधतो. तो बहुधा 'वाकड्यात' लपलेला असतो. विशुद्ध बुद्धी हे कृतीविषयक निर्णय घेण्याच्या संदर्भात थोतांड आहे. विशुद्ध बुद्धी केवळ तत्त्वज्ञानाच्या कामाची आहे.
असो. I think, I have exposed myself to serious and strong criticism. So be it. As I said, it would have been dishonest to stick to the point and not express the more serious disagreement.

Tuesday, December 13, 2011

Call them "Vishvahindu"

It is common knowledge that the RSS camp always bandies about untruths all the time and then treats them as facts. It is also common knowledge that many of them stoop to using filthy language to malign people they don’t like. SO, let us thank Shri Prabhu that he purports to use logic. (I am referring to the longish article titled "Ishrat Jahan case turn around : What Ishara to whom ? Author: Rajesh Prabhu" in 'Global Marathi Newsletter.)
But what form of logic! ‘.Has it been proved that Ishrat was not a terrorist / LeT operative?’ he asks. ‘Guilty till proved innocent’ is the new maxim of justice, it seems. I wonder if Shri Prabhu carries a certificate issued by the judiciary that it is proved that he is NOT a terrorist.
Then the ‘pseudo’ in bracket. Just as you cannot have a plain mujara; it must either be त्रिवार or मानाचा: ‘Secular’ does not exist; it is ‘pseudo secular’ by default.
There is an important point I wish to make. I am a Hindu and am proud of the fact. I also do NOT believe in god. And I don’t mind if beef is served to me. My religion is not dogmatic, does not have a holy book like the bible or the quoran. My religion permits me to have my own beliefs and canons. ‘Hindu’ is a way of life, they say. I totally agree. India would not survive if a rigid set of religious practices is imposed. So, I have to make a suggestion. Shri Prabhu and his clan is free to follow their own path; but I would rather they do not sully my religion by calling themselves simply as ‘Hindu’. I suggest that this tribe be described as ‘Vishvahindu’. I do not want anyone to confuse that they and I share religious tenets, though both are ‘Hindu’.
I agree in spirit with points made in para nos 8 and 9. The encounter specialist police officers and the killers of Ishrat are all murderers, as suggested by Shri Prabhu. Both must be condemned and I am sure Shri Prabhu will wholeheartedly support prosecution of all such police people, from Maharashtra and from Gujrat.
I have no wish to counter his fervent mudslinging and would like to make one last point. There was no post-Godhra riot in Gujrat; it was plain genocide. And it was state-sponsored. If Mr Modi is such an efficient administrator and has his finger on the pulse of his State; then he knew of the state-sponsored, police-supported genocide. That makes him a murderer. The mass killing of Muslims in Gujrat is as despicable as the anti-Sikh riots in Delhi and other places. Mr Modi is no better than the architects of the Sikh murders. All are worthy of condemnation; Mr Modi more so, because he was at the helm of affairs then. He could have averted the heinous crime but he chose to abet it.

Friday, December 9, 2011

अमेरिकन लोकांना जशी कलेचं विज्ञान करून टाकण्याची जबर हौस, तसं भारतीयांचंसुद्धा आहे; पण वेगळ्या संदर्भात.

कलेचं विज्ञान करणे म्हणजे काय? म्हणजे कला कलावंताची असते, विज्ञान अभ्यासाने कोणालाही साध्य असतं. उदाहरणार्थ, हौ टू विन फ़्रेंड्स अँड इन्फ्लुअन्स पीपल. पुस्तक वाचून जगमित्र व्हा. समाजात बदल घडवून आणायचाय? त्यासाठी कळकळ, बांधिलकी, अशा व्यक्‍तिनिष्ठ गुणांची आवश्यकता नाही; MSW कोर्समध्ये BCC शिकून घ्या. MSW म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क (पेशा, व्यवसाय म्हणून समाजकार्य करा). आणि BCC म्हणजे बिहेविअयरल चेंज कॉम्युनिकेशन (विशिष्ट तंत्रं वापरून संदेश प्रक्षेपित केला, की संदेशग्रहण करणार्‍याचं - करणारीचं - वर्तन अपेक्षित बदलासाठी अनुकूल बनतं). थोडक्यात, आत काही नसलं तरी बाहेरून सगळं परिधान करता येतं. आणि ते खर्‍याइतकंच प्रत्ययकारी ठरतं.

अशापैकी भारतात आहे ते काय? तर आपली कर्मकांडं. ती एकेका व्यक्‍तिगत अनुभवाला सामाजिक, सार्वजनिक करून टाकतात. मग माणसाची आत्मनिष्ठा पातळ होऊन तो समाजघटक बनतो. "आम्ही यापुढे एकत्र राहून सर्व काही शेअर करायचं ठरवलं आहे," अशी घोषणा करावीशी पशुपक्ष्यांना वाटत नाही; मनुष्यसमूहातल्या सदस्याला वाटते. तेव्हा लग्न हा विधी सामाजिकच. पण कोणा निकटच्या व्यक्‍तीचा मृत्यू? एरवी पाळली नाहीत, दिसली नाहीत; तरी रक्‍ताची नाती मृत्यूच्या वेळी ऑपरेशनल होतात. आणि आपल्याकडे नाती तरी किती. सगळे आप्‍तस्वकीय सांत्वनाला येतात. जावंच लागतं. ते येणार म्हणून मरणार्‍याच्या कुटुंबियांना तयार रहावं लागतं. कामासाठी, कशाहीसाठी बाहेर न जाता घरी थांबावं लागतं. सांत्वन करून घ्यावं लागतं. एक नाही, दोन नाही; म्हणे बारा दिवस. यात अंतर्मुख होण्याची संधी नाकारली जाते. जाणारी व्यक्‍ति नसण्याने आपल्या अस्तित्वात होणार्‍या पोकळीच्या परिमितीकडे न्याहाळायला मिळत नाही. आत खळबळ न होताच बाहेरच्या कर्मकांडांनी पोकळी भरली जाते.

कर्मकांडं लगेच ताबा घेतात. ती ताटी, तोंड या दिशेला की पाय? मडकं, त्याला दगडाने भोक पाडणे, ओठांवर पालथी मूठ आपटत बोंब मारणे. मंत्रपठण. काही लोकांच्यात मयताला आंघोळ घालतात. तो विवाहित पुरुष असेल, तर त्याच्या बायकोच्या हातातल्या बांगड्या विशिष्ट पद्धतीने फोडतात. या जात/जमातविशिष्ट रीतीभाती माहीत असलेले लोक भराभरा प्रॉम्टिंग करतात आणि गोष्टी घडत जातात. आतल्या पोकळीतली खळबळ गुदमरवून नष्ट केली जाते.

समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने हे अर्थातच आवश्यक आहे. मृत्यूचं दर्शन माणसाला ठार एकटं करू शकतं. सगळे बुद्ध होत नाहीत; पण प्रोसेस तीच असते, ज्याच्या त्याच्या संवेदनशीलतेच्या मर्यादेतल्या ज्ञानप्राप्‍तीची. असा एकटा होणारा माणूस समाजासाठी, समाजस्वास्थ्यासाठी अधिकाधिक कुचकामी होत जातो. कर्मकांडं या प्रोसेसला बांध घालतात.

असो.

Sunday, December 4, 2011

अक्षर दिवाळी अंकातल्या माझ्या शम्मी कपूरवरच्या लेखातून:
राज कपूर हे एक ’स्कूल’, एक ’घराणं’ होतं. सगळ्याच सिनेमांमध्ये तो आवाराप्रमाणे आईला द्यायला रोटी मिळाली नाही, म्हणून चोरीच्या रस्त्याला लागलेला गुंड, किंवा नशीब कमवायला शहरात येऊन शहरातल्या मोहमयी दुनियेत फसलेला श्री चारसोबीस नव्हता. अंदाजमध्ये तर तो जवळपास व्हिलनच होता. पण कोणीही असला, तरी तो दुबळा, व्हल्नरेबल दिसायचा. नर्गिसचं उलट होतं. (ती तर अदालत किंवा मदर इंडियामध्ये हताश, खचलेली असते; तेव्हासुद्धा दुबळी दिसत नाही.) त्याचं आणि नर्गिसचं प्रेमप्रकरण थट्टेवारी नेण्यासारखं मुळीच नव्हतं. मुळात, बहुतेक सिनेमांमध्ये तीच ती नायिका असूनही त्यांचा प्रणय जराही शिळा न वाटणे, हेच थोर होतं. त्या निष्ठावानपणाला सिनेमाबाहेर, जगण्यातलं मूल्य प्राप्त होत होतं. आणि कॉलेजचे दिवस मूल्यांचा शोध घेण्याचेच तर असतात!
देवचा नायक नायिकेशी खेळायचा; पण त्याच्या मवालीपणात एक रुबाब होता. आत्मप्रतिष्ठा होती. देव गरीब असो की श्रीमंत; त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा रुबाब तोच होता. पेइंग गेस्ट, तेरे घरके सामनेमध्ये नूतन; काला बाजार, गाइडमध्ये वहिदा; काला पानी, जाली नोटमध्ये मधुबाला; टॅक्सी ड्रायव्हर, नौ दो ग्यारहमध्ये कल्पना कार्तिक; हम दोनो, असली नकलीमध्ये साधना; कोणाशीही त्याची जोडी मस्त जुळायची. त्याच्या एका चाहत्याने त्याच्या मते निरुत्तर करणारा मुद्दा मांडताना म्हटलं होतं, "टॅक्सी ड्रायव्हर, जुगारी, गाईड, सैनिक, शराबी, काळा बाजार करणारा, ... सगळं करून दाखवलंय देव आनंदने!"
दिलीपची तर गोष्टच वेगळी. ’मला गंभीरपणेच बघा; माझा सिनेमा म्हणजे गंमत जंमत नव्हे!’ अशी त्याची दरडावणीच होती. दागमधला दारुडा असो, की आझादमधला रॉबिनहुड; दिलीपचा नायक सगळा स्क्रीन भरून टाकायचा. देवदास आणि गंगा जमना यांसारख्या दमदार रेखाटनांची गोष्टच सोडा. ट्रॅजेडी रोल करून निम्मीने दिलीपबरोबर जोडी जमवायचा प्रयत्न केला; पण जमलं नाही. नायक-नायिकेच्या प्रेमाविना चित्रपटच न बनण्याच्या त्या काळात दिलीपला स्ट्राँग जोडीदारीण असायचीच. मग तराना, मुगले आझममध्ये मधुबाला असेल; मधुमती, गंगा जमनामध्ये वैजयंतीमाला असेल; नाही तर दर रोज गर्वरूपी साबणाने नहात असल्यासारखी दिसणारी देवदासमधली सुचित्रा सेन असेल.

आणि आजच्या ’लोकमत’मधली ही देव आनंदला वाहिलेली श्रद्धांजली (मुळात मी लिहिलेली):
अमर प्रेम पुजारी
देव आनंदचा मृत्यू अकाली झाला, यात शंका नाही; काही माणसं तरुणपणातच हरपतात. त्यातलाच एक देव आनंद. त्याला भेटलेल्या प्रत्येकाला त्याच्या सळसळत्या उत्साहाचा संसर्ग व्हायचा; तरुण झाल्यासारखं वाटायचं. तरुण आणि उत्साही दिसणे, ही देव आनंदला ओळखण्याची सर्वात मोठी खूण होती. गंमत अशी की दिलीप, राज, देव या त्रिमूर्तीने सिनेमात कामं करायला सुरुवात केली, तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता. पण आमच्या पिढीचं ’सांस्कृतिक पोषण’ मॅटिनी शोवर झालं. म्हणजे, देव आनंद आमच्या मागच्या पिढीपासून तारुण्याचा आयकॉन होता. दिलीप हा परिपूर्ण नट; राज म्हणजे गरिबांचा, ’बिचार्‍यांचा’ प्रतिनिधी. पण अभिनयात कच्चाच असणार्‍या आणि गांवढळ, गरीब बिचारा न दिसणार्‍या देव आनंदच्या अचाट लोकप्रियतेचं रहस्य काय?
देव आनंद म्हण्जे काय? ’बाजी’तला जुगारी, ’जाल’मधला स्मगलर, ’टॅक्सी ड्रायव्हर’मध्ये टॅक्सी ड्रायव्हर, ’काला बाजार’मध्ये सिनेमाची तिकिटं ब्लॅकमध्ये विकायला सुरुवात करून तो वहिदा भेटल्यावर सुधारतो आणि ’सफेद बाजार’ काढतो. ’मुनिमजी’मध्ये दोन रूपांत वावरतो. बहुतेक चित्रपटांमध्ये त्याला एक तरी ज्यादा नायिका लागते; जी एकदा तरी त्याच्या रूपाची स्तुती करते. ’काला पानी’ मध्ये मधुबाला पहिल्यांदा दिसते, तो सीन आठवतो? देव आनंद एका पेपरच्या ऑफिसमध्ये आलेला असतो आणि समोरच्या टेबलवरची बाई प्रचंड कामात असते. शेवटी ती वळते आणि -- जग थांबतं. तो तिला आणि ती त्याला बघून अवाक् होतात. ’ज्वेल थीफ’, ’जॉनी मेरा नाम’, ’तेरे घरके सामने’, अगदी ’तेरे मेरे सपने’ सुद्धा; सर्व ठिकाणी देव आनंद साहेब स्वतःच्या विलक्षण प्रेमात असल्याचं जाणवत रहातं. इतरांनी आपल्या प्रेमात पडावं, ही त्याची अपेक्षा लक्षात येते.
ही देव आनंदची, देव आनंद या प्रतिमेची खरी ओळख.
आदर्शवादाने आणि डाव्या विचारसरणीने भारलेल्या स्वातंत्र्यानंतरच्या त्या काळात स्वतःवरच्या प्रेमाचं असं प्रदर्शन, असं कौतुक वेगळं होतं. ते खटकायला हवं होतं. पण देव आनंदच्या व्यक्तिमत्त्वात आणखी काही होतं. त्याचं स्वतःवरचं प्रेम त्याला इतरांना तुच्छ मानायला लावत नव्हतं. तो पडद्यावर आत्मकेंद्रित, आत्ममश्गुल वाटला नाही. लव्हेबल वाटला. इतका लव्हेबल, की एक मुलगी मला म्हणाली, याला पाळावासा वाटतो. घरी ठेवावा आणि याच्याकडून प्रेम करून घ्यावं!
तेव्हाची मूल्यं खरी होती. त्या मूल्यांनुसार स्वतःवर प्रेम करणं उल्लूपणाचं लक्षण होतं. पण देव आनंद मुळीच उल्लू ठरला नाही. ’इतरांवर प्रेम करायचं, तर अगोदर स्वतःवर प्रेम करायला शिका!’ असा महान संदेश तो देत राहिला.
स्वतःवर इतका खूष असलेल्या, इतरांकडून प्रेमाची अपेक्षा असणार्‍या या देखणेपणामुळेच ’बम्बईका बाबू’ मधली शोकांतिका जिवंत होते. इस्टेट लाटायला खोटा वारस म्हणून जातो आणि ’बहिणी’च्या प्रेमात पडतो! त्याला खरंच भाऊ मानणार्‍या तिच्या मनात कसं काही येणार?
पण ’बम्बईका बाबू’ हा अपवाद. स्वतःवरच्या प्रेमातून त्याच्या एकूणच वागण्यात जो लडिवाळपणा आला, त्याचा सुंदर परिणाम असा झाला, की नायिका कोणीही असो, देवशी तिची जोडी अनुरूपच वाटली. ’पेइंग गेस्ट’ आणि त्याच्यापेक्षा जास्त ’तेरे घरके सामने’ मध्ये नूतन आणि तो, काय शोभतात, एकमेकांना! ’काला बाजार’ मध्ये ’रिमझिमके तराने लेके आयी बरसात’ गाताना कशी मस्त वाटते देव-वहिदाची जोडी! ’नौ दो ग्यारह’ मध्ये त्या मवाली कल्पना कार्तिकला बघताना वाटतं, हीच खरी याची जोडीदारीण! ’हम दोनो’ आणि ’असली नकली’. सांगा पाहू साधनाच्या जवळ दुसर्‍या कोणी जावंसं वाटतं तरी का? ’ओ मेरे राजा’ हे तर नाटकी ड्युएट; पण ते नाटक करायला हेमा मालिनीबरोबर देवच हवा ना? ’पलभरके लिये कोई हमें प्यार कर ले’ मध्ये तर अंगाला हात न लावता तिची इतकी चावट मस्करी आणखी कोण करणार? ’जीवनकी बगिया मेहेकेगी’ गाताना देव आणि मुमताज किती प्रेमात दिसतात एकमेकांच्या. हिरो-हिरॉइनच्या ’केमिस्ट्री’ला फार किंमत असते. देव आनंद म्हणजे युनिव्हर्सल सॉल्व्हंट! कोणालाही विरघळवतो!
देव आनंदला कोण उल्लू म्हणेल? एक गोरा, एक काळा; एक शूर, एक भित्रा; एक सच्चा, एक झूटा; असे खूप डबल रोल झाले हिंदी सिनेमात. पण दोन्ही चिकणे, दोन्ही चांगले, दोन्ही सैन्यात; असे ’हम दोनो’ किती सापडतात? देव आनंदच्या नवकेतनने गुरु दत्तला, राज खोसलाला ब्रेक दिला. सचिन देव बर्मनला धरून ठेवला. गाइडसारखा अवघड विषयावरचा सिनेमा काढला. आणि हिंदी सिनेमाच्या इतिहासातला एक थोर दिग्दर्शक विजय आनंद नवकेतनचाच की.
’प्रेम पुजारी’ नंतर देव आनंदला दिग्दर्शक होण्याची इच्छा झाली आणि स्वतःच्या बॅनरखाली तो त्यानंतर आजतागायत सिनेमे दिग्दर्शित करत राहिला. पस्तीस वर्षं! स्वतःवरचं प्रेम विसरा; किती बांधिलकी या माध्यमाशी! देव आनंदने सिनेमातून पैसे मिळवून सिनेमेच काढले. आणि सार्‍या जगाला उत्साहाचे, तरुण वृत्तीचे धडे दिले. एका देखण्या, उमद्या, कामावर आणि काम करत रहाण्यावर प्रेम करणार्‍या अस्सल हिरोला प्रणाम!