Showing posts with label PIFF2021. Show all posts
Showing posts with label PIFF2021. Show all posts

Wednesday, April 14, 2021

चित्रपट महोत्सव आणि सामाजिकता

 

सगळ्या चित्रपटांचा मिळून घेतलेला हा आढावा. कधी कधी काहीतरी वेगळं, ज्यादा मिळून जातं, म्हणून.

शीर्षकातीलसामाजिकताया शब्दाबाबत थोडा खुलासा. तिथेसामाजिक जाणीवहा शब्दप्रयोग चालणार नाही, कारणसामाजिक जाणीवयाचा अर्थ समाजाप्रती असलेल्या उत्तरदायित्वाची जाणीव, असा होतो. तिथे नुसतंसमाजअसं म्हणता येत नाही कारणसमाजही संज्ञा वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या अर्थाने वापरली जाते. विनासंदर्भ ते गोलमाल होईल. ‘समाजया अस्तित्वाविषयी सजगता, हा अर्थ व्यक्त करण्यासाठीसामाजिकताअसा प्रयोग करण्यात आला आहे.

चित्रपटामध्ये किंवा कुठल्याही कलेमध्ये सामाजिक जाणीव कितपत असावी; कलेने व्यक्तिवादी, सौंदर्यवादी असावं की नसावं, हा वाद न संपणारा आहे. पण चित्रपटासारख्या अनेकांगी कलामाध्यमातून समाज कसा व्यक्त होतो आणि त्यातून त्या समाजाविषयीचित्रपटाच्या विषयाबाहेर जाऊनकाय अंदाज करता येतो, हा भाग रहातोच. त्या दृष्टिकोनातून पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पहायला मिळालेल्या चित्रपटांकडे बघण्याचा हा प्रयत्न आहे.

हा फेस्टिवल नुकताच पार पडला. मला त्याचा ऑनलाइन विभाग पहायला मिळाला. एकूण २६चित्रपटांपैकी मी २२ बघितले. प्रत्येकाविषयी स्वतंत्रपणे लिहून झालं. सगळ्यांचा मिळून विचार करताना काही वेगळ्या गोष्टी सुचतात. उदाहरणार्थ, हॉलिवुडचा एकही चित्रपट नव्हता. पण यात आश्चर्य नाही. ‘फेस्टिवलचा सिनेमाअशी जी ओळख आहे, तिचं व्यावच्छेदक लक्षणकेवळ व्यवसाय म्हणून न काढलेला सिनेमाअसं आहे आणि हॉलिवुड व्यावसायिक आहे. हॉलिवुडचा सिनेमा वाईट असतो, सर्वसामान्य असतो, प्रेक्षकांच्या किमान पातळीवरच्या अभिरुचीला आवाहन करणारा असतो, असं मानण्याचं कारण नाही; पण तो व्यावसायिक असतो आणि व्यवसायाच्या आड येतील अशा गोष्टी तो टाळतो, यात शंका नाही. त्या गोष्टी कोणत्या या तपशिलांत न जाता आपण उलट म्हणू शकतो की अशा गोष्टी मुद्दाम न टाळणारा सिनेमा फेस्टिवलमध्ये बघायला मिळतो. किंबहुना, हेच असल्या फेस्टिवलचं आकर्षण होय.

यात भारतीय चित्रपटही नाही. गोष्ट अशी आहे, की समजा यात एखादा भारतीयकोणत्याही भाषेतलाअसता, तरी मी तो बहुधा टाळला असता. कारण भारतीय चित्रपट बघण्याची संधी एरवी मिळू शकते; त्यासाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला हजेरी लावण्याचं कारण नाही. तिथे असेच चित्रपट बघावेत, जे एरवी सहजासहजी समोर येणार नाहीत. चित्रपटातले दर्दी किंवा या कलामाध्यमाचे अभ्यासक जगभरचे चांगले चित्रपट शोधून मिळवतात आणि बघतात. मी त्यांपैकी नाही. मी अशा दर्दी लोकांनी निवडलेले चित्रपट बघतो. वेगळ्या शब्दांत, फेस्टिवलला जातो. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियासाठी गोव्याला गेलो होतो; हा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आयता घरबसल्या बघायला मिळाला.

या २२ चित्रपटांपैकी नऊ चित्रपट पश्चिम युरोपातले तर पाच पूर्व युरोपातले आहेत. ‘युरोपातले तेरा (एक दोन्हीकडे घडतो, त्यामुळे दोन्हीकडे मोजण्यात आला आहे) चित्रपटअसं म्हणू नये कारण पश्चिम युरोप आणि पूर्व युरोप सामाजिकदृष्ट्या एकमेकांपासून वेगळे आहेत. हा वेगळेपणा त्यांच्या चित्रपटांतल्या तपशिलांमध्ये, सामाजिक पार्श्वभूमीत उमटतो. किमान, तो तसा उमटावा, अशी अपेक्षा असते. एकच तपशील या दोन ठिकाणी एकच अर्थ व्यक्त करेल, असं नाही. बावीसांपैकी एक चित्रपटआय नेव्हर क्रायपोलंड आणि आयर्लंड, असा दोन ठिकाणी, म्हणजे पूर्व आणि पश्चिम युरोपात घडतो. या दोन देशांमधला फरक तिथे आपोआपच स्पष्ट होतो. पूर्व युरोपातल्या पोलंडमधली गरीब मुलगी गाडी घेण्याची आकांक्षा बाळगून असते. पण ते सहजसाध्य नसतं. आयर्लंडला गेलेल्या तिच्या बापाने पैसे पाठवण्यावर ते अवलंबून असतं. तो तिथे मजूर म्हणून काम करत असतो; कारण तिथे मजुरी पोलंडपेक्षा जास्त असते आणि मजुरी देणारं कामही असतं. पण आयर्लंडमध्ये वस्तू महागही असतात! ती तिथे जाते तेव्हा तिला तिथे सिगारेट परवडत नाही.

हे कळणं काही कठीण नाही. ते दोन देश तरी आहेत; आपल्या इथे यूपी-बिहारमधून लोक मुंबईला येतात, त्यांची स्थिती नेमकी अशीच तर असते.

आणखी एक गोष्ट. आयर्लंडमध्ये अपघात होऊन बाप मरतो. त्याचं शव घरी आणून त्यावर योग्य ते अंत्यसंस्कार करणं आईला अपरिहार्य वाटतं. त्यासाठी बापाने मुलीच्या गाडीसाठी जमवलेले पैसे खर्च करावेत, असा तिचा आग्रह असतो. बापाने मुलीची गाडी घेण्याची हौस पुरवण्यासाठी मजुरीतून पैसे बाजूला काढावेत, मृत पतीवर प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याची प्रबळ इच्छा पत्नीने धरावी, हे तपशील पश्चिम युरोपपेक्षाआपल्यालाजास्त जवळचे वाटतात! सहज कळतात, मान्य होतात.

ही मुलगी सतरा-अठरा वर्षांची आहे. आयुष्यात प्रथमच ती परदेशी जाते आहे. तिच्यावर ओढवणाऱ्या विविध अडचणी, हा चित्रपटाचा प्राथमिक विषय आहे. अशा वेळी तिच्यावर ओढवणाऱ्या कठीण प्रसंगांमध्ये तिच्या अब्रूवर घाला पडणे, या संकटाचा समावेश असायला हवा. तो नाही. मात्र, हे एकूण युरोपच्या सुसंस्कृतपणाशी संबंधित असावं. ‘क्वीनया हिंदी चित्रपटातली नायिका जेव्हा एकटीच (आणि प्रथमच) परदेशी, म्हणजे युरोपात, म्हणजेच पश्चिम युरोपात, जाते; तेव्हा तिच्यावरही असला बांका प्रसंग ओढवत नाही!

पश्चिम युरोपातल्या चित्रपटांतब्लू आइज अँड कलरफुल माय ड्रेसही बल्गेरियन-जर्मन डॉक्युमेंटरी येते. एका दोन-तीन वर्षांच्या मुलीचं बागेत, इमारतींच्या आवारात, फूटपाथवर हिंडणं त्यात टिपलं आहे. यालाव्हॉइस ओव्हरनाही. म्हणजे दृश्याच्या मागे काही खुलासा करणारा आवाज नाही. कॅमेऱ्यासमोर जे घडतं, तेवढं दाखवलं आहे. त्यातून निरागसता व्यक्त तर होतेच; त्याबरोबर वातावरणातली शांतता आणि सुरक्षितता यांचीसुद्धा जाणीव होते. ही मुलगी एकटी आहे. ती बहुतेकदा विविध वयाच्या बालकांशीच बोलते; पण क्वचित प्रौढांशीही तिचा संबंध येतो. कुठेही कसल्याही धोक्याची चाहूल येत नाही. बल्गेरियन शहरी समाजात असं निवांत वातावरण आहे, असा निष्कर्ष काढावा का?

अ फिश स्विमिंग अपसाइड डाउनया चित्रपटाची कथा एका कुटुंबात घडते, असं म्हणण्यापेक्षा एका घरात घडते, असं म्हटलं तर जास्त बरोबर होईल. बाप आणि मुलगा यांच्यात संवाद नाहीच, असं म्हणता येत नसलं तरी प्रत्येकाचं वर्तन कौटुंबिक नातेसंबंधांकडे डोळेझाक करूनच होत असतं. पुन्हा, यात पश्चिम युरोपमधल्या समृद्ध, व्यक्तिकेंद्रित समाजाचं प्रतिबिंब आहे, असं म्हणता येईल का? यातली नायिका तर उन्मुक्त जगणाऱ्या व्यक्तीचं उदाहरण भासते. तिच्या प्रतिसादांमध्ये (क्षणिक वा स्थायी) मोह, आकर्षण यांचा प्रभाव असण्यापेक्षाकाय केलेलं चालतं आणि काय चालत नाहीयाविषयीची बेफिकिरीच अधिक असल्यासारखी वाटते. वेगळ्या शब्दांमध्ये म्हणायचं, तर सामाजिकतेचा अभाव दिसून येतो.

रोलां रेबेर्स कॅबरे ऑफ डेथहा जर्मन चित्रपट तर सरळ सरळ समाजात, विशेषत: बायकांच्यात दिसून येणाऱ्या तारुण्याच्या ओढीवर, आपल्याकडे लोकांचं लक्ष जात रहावं, या इच्छेवर तिरकस नजर टाकतो. हे सगळे लोक पैशाने मोठे असतात, कलावंत असतात किंवा कलेविषयी आत्मियता बाळगून असतात, वगैरे. हा चित्रपट कुण्या एकाची कहाणी नाही. तो माणसांच्या अनेक तऱ्हा न्याहाळतो. म्हणजे तो आगळ्या स्वभावाच्या मोजक्या व्यक्तींची गोष्ट सांगत नाही. कोणत्या अपवादात्मक घटनांमुळे त्यांच्यावर एखादी कृती लादली जाते, असंही वाटत नाही. हा चित्रपट जर त्या समाजाचं प्रातिनिधिक चित्र समोर आणतो, असं मानलं; तर तिथे विषमता किंवा गरिबीपेक्षा समृद्धीमागोमाग येणाऱ्या मानसिक समस्या जास्त मोठ्या दिसू लागल्या आहेत, असं म्हणावं का?

फोर्ट्रेसहा इटालियन चित्रपट पूर्णपणे तुरुंगात घडतो आणि त्यातले सगळे कलावंत तुरुंगाचे रहिवासी आहेत. विसाव्या शतकातल्या श्रेष्ठ कादंबऱ्यांमध्ये गणना केल्या जाणाऱ्या लेखनकृतीवर हा आधारलेला आहे. यातही तुरुंगाची, तुरुंगातील एका कैद्याची वा काही कैद्यांची कहाणी नाही. हा तुरुंग म्हणजे वाळवंटालगतचा एक किल्ला आहे. होऊ घातलेल्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी सदैव सज्ज असलेला. मात्र ते आक्रमण कधीच होणार नाही, याची जाणीव प्रत्येकाला आहे. ज्या संभाव्य घटनेशी इथलं अस्तित्व आणि इथल्या जगण्याचे तपशील जोडलेले आहेत, ती घटना कधीच घडणार नाही आहे; हे अगदीच अस्तिववादी झालं. इथे काही घडत नाही आणि तरीही ही जागा इथे आलेल्याला धरून ठेवते, ही त्याच्याही पुढची पायरी. यातून एकूण मानवी मनावर काही प्रकाश पडत असेल; पण यात भूगोलात वसलेली सामाजिकता नाही. म्हणजे पुन्हा तेच. यात समाजाअंतर्गत ताणतणाव नाहीत.

टेल्स फ्रॉम द लॉकडाउनमध्ये स्पेनमध्ये लॉकडाउनच्या काळात घडणाऱ्या काही घटनांचं चित्रण आहे. त्यात हिंसेचे विविध पैलू बघायला मिळतात. लॉकडाउनमुळे समाजातल्या वेगवेगळ्या व्यक्तींवर कसे वेगवेगळे पेचप्रसंग ओढवले, हे दिसतं; पण व्यक्ती व्यक्तीच रहातात, त्यांच्यामधूनसमाजव्यक्त होत नाही. एकेका कहाणीत जे घडतं, त्याला त्या कहाणीतल्या पात्रांच्या वर्तनाशी, कहाणीतल्या वैशिष्ट्यपूर्ण घटनेशी थेट जोडता येतं. समाज असं करेल किंवा समाज असं करायला भाग पाडेल; यातलं काही म्हणता येईलसं वाटत नाही. कथानकाला पुढे ढकलण्याची क्रियासामाजिकनाही.

पश्चिम युरोपात असं दिसतं याचं कारण कदाचित तिथल्या सामाजिक उत्क्रांतीमध्ये असेल. माणसातले व्यक्तिगुण त्याच्या सामाजिक रूपाला झाकून टाकत असतील. प्रत्येक मनुष्य वेगळा आहे, स्वतंत्र आहे आणि प्रत्येक मनुष्याच्या इच्छेचा मान ठेवण्याची सहजप्रवृत्ती सगळ्यांच्यात बाणवणे हेच जर सुसंस्कृततेचं अंतिम श्रेय असेल, तर या समाजाने पुढचा पल्ला गाठला आहे, असं म्हणता येईल.

माय फादर्स स्टोरीजहा फ्रेंच चित्रपट या प्रतिपादनात बसतो आणि बसत नाही. तो बसतो, कारण इथलं प्रमुख पात्र नॉर्मल नाही. ते नॉर्मल नसण्यातूनच चित्रपटाला दिशा मिळाली आहे. ‘बसत नाही,’ असंही म्हणता येतं कारण चित्रणाचा भर त्या पात्राच्या विकृतीवर नाही तर त्या विकृतीमुळे इतर, सर्वसाधारण पात्रांच्या जगण्यावर काय प्रभाव पडतो, यावर आहे.  ही पात्रं मुख्यत: आहेत, त्याची बायको आणि त्याहीपेक्षा जास्त, त्याचा मुलगा. खटकणारी गोष्ट अशी की फ्रान्समधल्या कुटुंबातली ही स्त्री नवऱ्याचं विचित्र वर्तन सहन करते, समाजापासून त्याचा बचाव करते आणि मुलालासुद्धा तशीच शिस्त लावण्याचा प्रयत्न करते. ती घटस्फोट घेत नाही, त्याला सोडून जात नाही! तिच्या या वागण्याचं समर्थन चित्रपट तिच्याच स्वभावातल्या कुठल्या गुणवैशिष्ट्यावरून करताना दिसत नाही. मुलगा तर लहान आहे. आईवडील हे त्याच्या जगण्याचे, त्याच्या मूल्यचौकटीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. ती असं का करते, याला उत्तरपत्नीधर्मअसं सुचतं. कदाचित माझ्या नजरेतून काही महत्त्वाचं सुटलं असेल. पण उत्तर जर हे असेल, तर चित्रपटसामाजिकआहे, कारण पातिव्रत्य सामाजिक आहे, वैयक्तिक नाही.

हा चित्रपट काहीसा मागच्या, दुसरं महायुद्ध संपल्यानंतरच्या काळात घडतो, असं म्हणून यातून सुटका करून घेता येईल: त्या काळात तिथली सामाजिक उत्क्रांती खालच्या पायरीवर होती!

लँड ऑफ द फरगॉटनहा आणखी एक इटालियन चित्रपट. हा १९५१ सालात घडतो. एका डोंगराळ भागातील गावाने अन्याय, पिळवणूक यांविरुद्ध दिलेला लढा, हा या चित्रपटाचा विषय. पण सामाजिक-वैयक्तिक मांडणी करण्याच्या ओढाताणीत तो ना धड इकडचा ना तिकडचा झाला आहे. समस्या सामाजिक आहे; पण तिची उकल सामाजिक कृतीतून होत नाही! आपल्या काही हिंदी आणि बऱ्याच दक्षिणी चित्रपटांतही शेवटी नायक (समाजावर अन्याय करणाऱ्या) खलनायकाला बेदम चोप देतो आणि सर्वत्र आनंदीआनंद होतो, असं असतं; पण ते इतकं बेगडी असतं कीआपल्या सामाजिक समस्या निरुत्तर करणाऱ्या आहेत,’ असाच जणू निष्कर्ष हे चित्रपट प्रेक्षकांसमोर ठेवत असतात. ‘लँड ऑफ द फरगॉटनचं तसं होत नाही. समाज की व्यक्ती, या दुविधेला चित्रपट भिडतच नाही, असं वाटतं. १९५१ सालात इटलीतल्या अत्यंत दुर्गम भागात रहाणारे खेडूत असले म्हणून काय झालं; त्यांना जर लिहिता वाचता येत असेल, तर गांधी माहीत हवेत, असं मात्र प्रकर्षाने वाटतं! मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला अशा नेत्यांना सामाजिक-राजकीय अन्यायविरोधी वाट शोधण्यासाठी गांधी उपयोगी पडले!

इंटू द डार्कनेसहा चित्रपट दुसऱ्या महायुद्धाच्या काळात डेन्मार्कमध्ये घडतो. त्यात युद्ध नाही कारण डेन्मार्कने जर्मनीसमोर शरणागती पत्करली होती. परंतु डेन्मार्क राष्ट्र किंवा डॅनिश लोक जर्मनीला, जर्मनांच्या युद्धखोरीला सामील झाले नव्हते. या चित्रपटाचा सगळा रोखसंघर्ष टाळून शरण गेलेल्या समाजामध्ये कोणकोणत्या प्रतिक्रिया उमटतात,’ यावर आहे. हा समाज एकसंध नाही. जे ज्यू आहेत, त्यांचे प्राणच धोक्यात आहेत. तीच गत कम्युनिटांची आहे. स्वत:चे प्राण वाचवण्यासाठी प्राणपणाने जर्मन वरचष्म्याला विरोध करण्यावाचून त्यांना इलाज नाही. त्यातही ज्यूंपेक्षा कम्युनिस्ट गनिमी संघर्षाला जास्त तयार आहेत. इतरांपैकी काही करियरिस्ट आहेत, काही भावनाप्रधान आहेत, काही बाणेदार आहेत, तर काही व्यवहारवादी आहेत. काही कर्तव्याच्या तागडीत हेलकावणारेदेखील आहेत. एकूण, समाजातल्या विविध प्रवृत्तींचे प्रतिनिधी आहेत. मग याला सामाजिक चित्रण का म्हणू नये? परकी आक्रमकांसमोर एका समाजातील विविध विचारधारांचं काय झालं, या दृष्टीने पाहिलं, तर तसं म्हणायला हरकत नाही. पण इथे जरी एकेकाच्या वागण्यात फरक दिसत असला, तरी सगळा समाज एका बाह्य शत्रूशीप्रभावाशी दोन हात करतो आहे. स्वत:च्या गतीने चालणाऱ्या समाजातील ताणतणाव, संघर्ष, तडजोडी यांचं स्वरूप वेगळं असतं. म्हणजे, शक्तिमान शत्रूशी जळवून घेणारा शत्रू नसताना नेमस्त असेल का? शत्रूला पूर्णपणे सामील होणारा एरवी राष्ट्रद्रोही होईल का? भावनेच्या आहारी जाऊन अतिरेकी कृती करणारा शांततेच्या वातावरणात कृतिशील असेल का? या प्रश्नांना निश्चित उत्तरं देता येत नाहीत. तरी या चित्रपटाला सामाजिकतेतून बाद करता येत नाही. चुकलेल्या मुलाला वाचवण्याचा आटापिटा करणारा बाप कौटुंबिक मूल्यंच दाखवतो.

त्याहीपेक्षा जास्त साक्षात्कारी संवाद चित्रपटात आहे. उद्योजक नवरा जर्मनांच्या अरेरावीसमोर नमतं घेतो, हे पाहून त्याची बायको नाराजी व्यक्त करते. तेव्हा तो उत्तरतो, तुझ्या बापाप्रमाणे माझी संपत्ती वडिलोपार्जित नाही! या उत्तराला अनेक फाटे फुटू शकतात. स्वकष्टार्जित संपत्तीपेक्षा वडिलोपार्जित संपत्तीवर पाणी सोडणं तुलनेने सोपं असतं, हा एक विचार झाला. स्वत:च्या कमाईशी असते तशी बांधिलकी नसण्यातूनराष्ट्रासाठी त्यागकरण्याकडे तो जास्त सहज प्रवृत्त होऊ शकतो. विशेषाधिकारांची सवय हाडात मुरल्यामुळे विशेषाधिकार गमावण्याचा सुप्त संबंध राष्ट्राने स्वातंत्र्य गमावण्याशी लागून या सुप्त उद्देशाने केलेली कृती स्वत:च्याच बाह्य मनात त्या उद्देशाला जोडली जाऊ शकते! जन्मापासून सुबत्ता उपभोगणाऱ्याला सुबत्तेवर आपला निसर्गदत्त आणि अपरिवर्तनीय अधिकार आहे, असं वाटायला लागून त्याच्या वागण्यात सबुरीचं प्रमाण कमी होऊ शकतं.

खूप जास्त पैलू समोर आणण्याच्या प्रयत्नात हा चित्रपट थोडा लांबला आहे. त्याचा शेवटही सोडून दिल्यासारखा वाटतो. ‘अखंड चाललेल्या जीवनाचा एक तुकडाअसं जरी चित्रपटाच्या सादरीकरणाला म्हटलं, तरी कुठेतरी काहीतरी सुरू झालं आणि तसंच कुठेतरी ते संपलं, असं तर गोष्टीचं व्हायलाच पाहिजे! आणि चित्रपट म्हणजे वेगळ्या माध्यमातून सांगितलेली गोष्टच होय.

आता पूर्व युरोपकडे जाऊ. तिथले सर्वच चित्रपटसामाजिक वळणाचे होते, असं म्हणता येत नाही; पण तिथल्या व्यक्तिगत समस्या वेगळ्या असलेल्या दिसतात. त्याला भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक कारणं आहेत. उदाहरणार्थ, ‘द लॉयरया चित्रपटात सामाजिक समस्या हा विषय नाही. हा चित्रपट बल्गेरिया आणि सर्बिया या दोन देशांत घडतो; मात्र त्यात दोन्हीकडल्या राष्ट्रपातळीवरच्या घडामोडींचं चित्रण नाही. पश्चिम आशियातील अस्वस्थ परिस्थितीमुळे बाहेर पडलेले निवार्सित पूर्व युरोपात तुलनेने जास्त आले, याचा मात्र चित्रपटातील समस्येशी थेट संबंध आहे. म्हणजे हा चित्रपट युरोपच्या पश्चिमी संस्कृतीकडे झुकलेला आहे, असं म्हणता येईल.

इथे एका गोष्टीचा खुलासा करायला हवा. सांस्कृतिक, सामाजिक या विशेषणांनी युक्त असलेली स्थिती भौतिकविज्ञानाप्रमाणे सुस्पष्ट सीमारेषा असलेली नसते. ज्याप्रमाणे अर्थशास्त्रातल्या नियमालास्टेटमेंट ऑफ टेण्डन्सीजम्हणतात, तसंच.  पूर्व युरोप आरि पश्चिम युरोप यांच्यातला फरक असाच आहे. एकीकडे कुटुंबसंस्था आहे आणि दुसरीकडे ती लयास गेली आहे, अशी मांडणी इथे नाही. कुटुंबसंस्थेचं प्राबल्य हा मुद्दा मात्र नक्की आहे.

स्टिचेसहा सर्बियन चित्रपट एका व्यक्तीचा, जन्मत:च बाळापासून तुटलेल्या आणि १८ वर्षं त्याला शोधण्याचा ध्यास शेवटपर्यंत न सोडलेल्या आईचा आहे. ती, तिचं कुटुंब, शेजारी, परिचित यांचं दर्शन घडत असताना इथे कौटुंबिक, सामाजिक बंध जास्त घट्ट आहेत, हे जाणवल्याविना रहात नाही; जरीआय नेव्हर क्रायप्रमाणे तारुण्य बंडखोरच असलं, तरी! सुरुवातीलाच ती मुलाच्या वाढदिवसाचा केक बनवते! तिची टीनेजर मुलगी अर्थातच नाराज होते. तिच्या मते आई कधीच नसलेल्या भावात जास्त गुंतलेली आहे आणि तिच्याकडे दुर्लक्ष करते आहे. या बाईचा नवरा तिच्याविषयी सहानुभूती बाळगून असला, तरी तो तिच्या दु:खात, तिच्या विकृत म्हणावं अशा ध्यासात सहभागी नसतोच. संपूर्ण चित्रपट या बाईच्या व्यक्तिरेखेभोवती उभा आहे आणि त्या नटीच्या अप्रतिम अभिनयामुळे ताठ उभा आहे.

एका परीने ही व्यक्तीची कहाणी आहे. पण चित्रपट संपल्यावर पडद्यावर सर्बियात जन्मल्यावर लगेच पळवून विकल्या गेलेल्या बाळांची संख्या दाखवली जाते आणि संपूर्ण चित्रपटाला सामाजिक अंग मिळून जातं!

क्वो वादिस, आयदा?’ या चित्रपटात बोस्नियाची परवड समोर येते. युगोस्लावियाचे तुकडे पडत असताना वेगळे झालेल्या  देशांमधल्या लोकांत परस्परांविषयी असलेला कमालीचा विद्वेष बाहेर आला आणि त्यातून अमानुष हिंसा घडली. यात तिथल्या इस्लामधर्मीय लोकांची तर सरसकट कत्तलच झाली. बोस्नियातल्या अशाच एका गावावर सर्बियन सैनिक कब्जा करतात आणि पुढे काय होतं, याची ही गोष्ट. यूनोच्या संरक्षणाखाली असूनही गावाला धोका टाळता येत नाही. या चित्रपटाने सामाजिक आणि वैयक्तिक यात तोल सांभाळला आहे, असं वरवर भासलं, तरी यातला वैयक्तिक भाग समाजात रुजलेल्या मूल्यांकडेच निर्देश करतो. आयदा ही शिक्षिका यूनोच्या लोकांसाठी दुभाष्याचं काम करत असते. परिणामी यूनोचे अधिकारी जिथे जातात, तिथे आयदा शेजारी असते. ते जे बोलतात, ते ती भाषांतर करून सांगते. परिणामी गावातल्या सगळ्या लोकांना आयदा हीच वशिल्याची, मदतीची जागा म्हणून दिसू लागते. यूनोच्या लोकांचं तर तिच्याविना चालतच नाही.

सर्ब सेनाधिकारी तोंडाने जरी काही म्हणत असला, तरी तो शेवटी सगळ्या बोस्नियन गावकऱ्यांची कत्तलच करणार आहे, याबद्दल गावात कोणालाही शंका नसते. त्यांना यूनोचा वरवर आधार वाटत असतो; पण तो किती पोकळ असतो, हे वेळ येताच दिसून येतं. जेव्हा शेवट जवळ येतो, भीषण भविष्य स्पष्ट होऊ लागतं, तेव्हा आयदा जिवाच्या आकांताने आपला नवरा आणि दोन मुलं यांना वाचवू बघते. अचानक सर्व गावाची आयदा केवळ तिच्या कुटुंबाची होऊन जाते. माकडीण आणि तिचं पिल्लू, या गोष्टीतली ही जणू शेवटून दुसरी पायरी.

यात कुटुंब आणि समाज, यात विरोध असल्यासारखं भासत असलं, तरी यामुळे चित्रपटाची सामाजिक भीषणता जास्त ठळकपणे पुढे येते. अमुक ठिकाणी इतकी माणसं मारली, ही आकडेवारी असते; पण त्या माणसांची नावं आणि त्यांचे फोटो यांच्यामुळे मृत्यूला चेहरा मिळतो. तसाच चेहरा मग क्रौर्यालाही मिळतो आणि त्या कृत्यामधली भीषणता प्रकर्षाने जाणवते. आयदाच्या गावावरचं संकट प्रेक्षकाला कळत असतं; पण आयदाच्या तडफडीमुळे त्यातली अमानुषता बाहेर येते.

चित्रपटाच्या शेवटी पुन्हा शांतता प्रस्थापित झाली आहे आणि शाळेत लहान मुलं खेळत आहेत, असं दृश्य आहे. त्याचं प्रयोजन कळलं नाही. कारण त्यानंतर पडद्यावर त्या गावातले सगळे, म्हणजे काही हजार पुरुष गोळ्या घालून ठार करण्यात आले, असं शब्दांत येतं. बालकं खेळताहेत, वातावरण शांत आहे, हे चित्र फसवं असतं, त्याच्या आगेमागे अमानुष हिंसा असते, असं चित्रपट सांगू बघतो का?

इनहेल-एक्झहेलहा जॉर्जियन चित्रपट पुन्हा एका स्त्रीच्या एकटेपणाचा आहे. नवऱ्याचा गुन्हा स्वत:च्या डोक्यावर घेऊन ती तुरुंगात जाते पण त्याबद्दल तिला शून्य सहानुभूती मिळते. मुलीला काही माहीत नसतं, मुलगा अगदी लहान असल्यामुळे  ती परत आल्यावर तिला ओळखतच नाही, नवरा स्वत:च्या जगण्यात गर्क असतो आणि त्यात तिने बदल करण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी तिलाच दटावतो. बाकीचे नातेवाईक तोंडदेखले असतात. बाहेर सोबत शोधण्याचे तिचे प्रयत्न विफल होतात.

हीसमाजाची गोष्टनव्हे. पण गोष्ट घडण्याचं माध्यम समाजाचा एक घटक, म्हणजे कुटुंब, हे आहे. तिला एक प्रकारे कौटुंबिकच आधार हवा असतो. तो मिळत नाही आणि ती निराश होते. ही नैराश्याची कथा आहे. या बाईच्या वाट्याला पहिल्यापासून दुरावाच येतो, हे जाणवत रहातं. तिच्या चेहऱ्यावर उदास भाव तर आहेतच; पण चित्रपटाचं वातावरण कधीही प्रसन्न, उत्साही भासत नाही. माणसं तशी नाहीत आणि परिसरही नाही. यातले प्रसंग एकाला एक जोडून न येता तुटक आल्यासारखे वाटतात; तिचं एकटेपण जराही विसरता येत नाही. चित्रणातून, वातावरणातून आशय पोहोचवण्याचे जे प्रकार जाणवतात, त्यावरून असं वाटतं, की जॉर्जिया हा एकेकाळच्या सोवियत युनियनचा भाग होता, यापलीकडे तिथल्या सामाजिक, सार्वजनिक जीवनाची कल्पना आपल्याला फारशी नाही; त्यामुळे काही संवेदनशील तपशील निसटून जात असावेत.

महोत्सवात जगाच्या कानाकोपऱ्यातून चित्रपट यावे लागतात. इथे दक्षिण अमेरिकेचं प्रतिनिधित्व ब्राझीलने केलं आहे. दोन चित्रपट ब्राझीलमध्ये घडतात. मेक्सिकोला दक्षिणेत मोजलं तर टुवर्ड्स द बॅटलहा तिसरा चित्रपट. हा चित्रपट फ्रेंच माणसाबद्दल असला तरी तो मेक्सिकोत घडतो आणि फ्रेंच विरुद्ध मेक्सिकन युद्धाची पार्श्वभूमी त्याला आहे. फोटोग्राफरला होणाऱ्या ज्ञानाची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटातही म्हटलं तर सांस्कृतिक कॉमेंट्स आहेत. उदाहरणार्थ, लढाईच्या शोधात भटकणाऱ्या फ्रेंच फोटोग्राफरला एक दृश्य दिसतं, ज्यात सैनिक खोटे खोटे मरून पडलेले असतात आणि फोटो काढून झाल्यावर उठून आपल्या कामाला लागतात. हे खोट्या लढाईचे फोटो काढणारा अमेरिकन असतो. या फ्रेंच फोटोग्राफरची कीर्ती त्याच्या कानी पडलेली असते आणि तो त्या फ्रेंचाचा सहाय्यक म्हणून काम करायला उतावीळ असतो. तसंच, लढाई चालू असताना एक बडा मेक्सिकन अधिकारी नागड्या बायकांच्या वेढ्यात, दारू बिरू पीत रंगलेला असतो. तसंच, हा फ्रेंच मनुष्य खड्ड्यात पडलेला असताना एक मेक्सिकन गावकरी त्याला बाहेर काढून त्याचे प्राण वाचवतो; शत्रू मानून सोडून जात नाही. पण दुसरा गोरा मैत्री करतो आणि घोडा घेऊन पळून जातो! मुळात तरुण मुलगा मृत्यू पावल्याचं दु:ख विसरण्यासाठी पॅरिसमधल्या सुखासीन जगण्याला सोडून हा फ्रेंच पुरुष लढाईचे फोटो काढण्याच्या उद्देशानेच मेक्सिकोत येऊन हाल भोगत असतो. या सगळ्यातून १. फ्रेंच माणसाने दु:ख विसरण्यासाठी सुखासीन जगणं सोडून वेगळे फोटो काढायला मिळतील म्हणून भलतीकडे भटकणे, . अमेरिकन माणसाने खुशाल खोटेपणा करून व्यवसायाशी अप्रामाणिक होणे, . मेक्सिकन सेनाधिकाऱ्याने ऐन लढाईत ऐश करणे, . सामान्य मेक्सिकन माणसाने वैर, लढाई विसरून अपरिचित माणसाचे प्राण वाचवणे, . एका गोऱ्या माणसाने मैत्री दाखवून घोडा घेऊन पळून जाणे, या कृत्यांना फ्रेंच, अमेरिकन, मेक्सिकन स्वभाववैशिष्ट्यांच्या छाया मानावं की त्या त्या व्यक्तींचे स्वभावविशेष मानावेत?

ब्राझीलमध्ये घडणाऱ्या दोन चित्रपटांपैकी एक (ऑल द डेड वन्स) गुलामगिरी प्रथा नुकतीच बंद केली असतानाच्या काळात, म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला घडतो. दुसरा वर्तमानातला आहे. गुलामगिरी बंद झाल्यावर गुलामांचे (एके काळचे) मालक आणि पूर्वाश्रमीचे गुलाम, दोघेही सैरभैर होतात. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेताना त्यांची त्रेधा उडते. मुक्त गुलामांना स्वातंत्र्याचा उपभोग कसा घ्यायचा कळत नाही. आर्थिक स्थैर्य आणि नव्याने मिळालेले अधिकार यांच्यात कधी कधी रस्सीखेच होते पण मुक्त गुलामांचा कल पोटाला थोडा चिमटा घेऊन स्वातंत्र्याच्या बाजूने जाण्याचा दिसतो. जे अगोदर गुलाम होते, त्यांच्याशीसभ्यवर्तन करण्याची धडपड गोरे मालक करतात; पण त्यांना स्वत:ची कामं कुठे नीट करता येत असतात? श्रद्धा, समजुती, सवयी, सोय यांच्या गडबडगुंड्याचं चित्रण इथे सर्रियल पातळीवर केलेलं आहे. खरं काय, अतिरेकी चित्रण कुठलं, भास कोणते आणि सरळ सरळ विकृती कोणती, यांची सरमिसळ होत रहाते.

या चित्रपटाकडे सामाजिक दृष्टीतून बघून चित्रपटाचं मूल्यमापन करणं, त्याचं स्थान ठरवणं हे प्रेक्षकाच्या निवडीवर आहे. जेव्हा व्यक्तीला समाजातील अमुक प्रवृत्तीचा प्रतिनिधी म्हणायचं असतं, तेव्हा त्या व्यक्तीमध्ये तऱ्हेवाईकपणा, विकृती, खटकणारी वैशिष्ट्यं या गोष्टी किमान स्तरावर ठेवाव्या लागतात. तसं नसेल, तर घडणाऱ्या घटनांची संगती सामाजिक अंगाने न लावता व्यक्तीच्या कृतीवरून लावणं शक्य होतं. हा चित्रपट म्हणूनचसोपानाही, एक सामाजिक शेरा, असं म्हणून त्याचं स्थान निश्चित करता येत नाही. त्यातल्या पात्रांना स्वत:चे, ठळक असे स्वभाव आहेत. त्यामुळे काही चमत्कारिक व्यक्तींचं अनपेक्षित स्थितीमधलं वर्तन,’ असंही त्याकडे बघता येतं. चित्रपट सादरीकरण एकाच वेळी अनेक पातळ्यांवर होऊ शकतं, हे चित्रपट माध्यमाचं सामर्थ्य या चित्रपटात अधोरेखित होतं.

वॅलेन्तिना हा दुसरा ब्राझीलियन चित्रपट सरळ आहे, त्यात अशी गुंतागुंत नाही. लिंगबदल केल्यामुळे समाजाच्या काही भागाकडून मिळणारी कडू वागणूक, हा या चित्रपटाचा विषय आहे. ही वागणूक चुकीची होय, असं यात अगोदरच ठरलेलं आहे. त्यामुळे सर्व सूज्ञ लोक त्या वागणुकीला विरोध करतात आणि विरोध करणारे आणखीही काही चुकीचं करत असतात. इतकंच काय, शेवटीउद्याची पिढी’, म्हणजे शाळेतले विद्यार्थी बहुसंख्येनेपुरोगामीबाजू घेतात. आपोआपच विरोध करणारे खलप्रवृत्तीचे ठरतात. म्हणजे हा चित्रपट प्रचारकी आहे. एका पुरोगामी भूमिकेचा तो प्रचार करतो. पण म्हणजेच तो तटस्थपणे सामाजिक स्थिती दाखवत नाही. लिंगबदल करून घेण्याला समाजाची वृत्ती सर्वसाधारणपणे विरोधी आहे, त्या वृत्तीत बदल घडवून आणायला हवा; असा, जास्त समंजस रोख चित्रपट ठेवत नाही. सुरुवातीपासून प्रेक्षक लिंगबदल केलेल्या मुलीवषयी सहानुभूती बाळगेल, अशाच दिशेने चित्रपटाची पटकथा रचलेली आहे. ती मुलगी पूर्ण मुलगी दिसते, हे तिच्या बाजूने कल होण्याचं आणखी एक मोठं कारण (जरी ही भूमिका करणारीनेसुद्धा लिंगबदल करून घेतलेला आहे) . समाजातला एक मोठा वर्ग लिंगबदलाच्या विरोधी असेल, तर चित्रपटातली मध्यवर्ती समस्या उभी रहाते. पण त्यासाठी त्या वर्गाच्या समजुती, श्रद्धा यांनाही काही जागा मिळायला हवी. ते इथे होत नाही.

तरी या चित्रपटातल्या दोन गोष्टी आवर्जून सांगण्यासारख्या आहेत. एक म्हणजे, ती मुलगी साध्या, निम्नवर्गीय घरातली आहे. तिच्या या क्रांतिकारक म्हणता येईल अशा निर्णयाने तिची आई उद्ध्वस्त तर होत नाहीच, ती खचूनही जात नाही. उलट, मुलीच्या मागे उभी रहाते. जे होईल, ते दोघी मिळून भोगू, असा खंबीर पवित्रा घेते. (बाप मात्र पळून जातो!)

चित्रपटाचं दुसरं वैशिष्ट्य अगदी शेवटी येतं जेव्हा वॅलेन्तिना तिच्यावर धावून जाणाऱ्याला बेडरपणे प्रश्न करते, ‘‘हवं तसं जगण्याचं स्वातंत्र्य मला आहे, याचा तुला इतका त्रास काय म्हणून होतो?’’

हा प्रश्न जरी एका परीने निरुत्तर करणारा असला, दुसऱ्याच्या जगण्याच्या स्वातंत्र्यावर आक्रमण करण्याचा अधिकार परंपरेच्या नावाने कसा बळकावला जातो, हे उघड करणारा असला; तरी समाज विरुद्ध व्यक्ती या मांडणीत समाजाला सोडून व्यक्तीच्या पारड्यात  वजन टाकण्यासाठी प्रेक्षकाला प्रवृत्त करण्यासाठी ही योजना आहे, असं म्हणता येईल.

उरलेल्या चित्रपटांमध्ये हायफा या इस्रायली शहरात घडणारा आणि इस्रायलींच्या बरोबर पॅलेस्टाइनी पात्रं असलेला चित्रपट आहे. कथा उच्चभ्रू लोकांमधली आहे. त्यांच्यातल्या नैतिकतेचा सैलपणा समोर येताना त्यांच्या जगण्यातल्या समस्यासुद्धा दिसतात; पण समस्यांपेक्षा त्यांच्या जगण्यातला पोकळपणाच जास्त जाणवतो. पैसेवाल्या पॅलेस्टाइनींचं इस्रायलमध्ये फार वाईट चाललेलं नाही, असं सुचवलं जातं. एकही पात्र खंबीरपणे नैतिक भूमिका घेत नाही. चौकट बदलली की नैतिकतेचे निकषही बदलताना दिसतात.

फनी बॉयची कथा श्रीलंकेत तमिळींची यादवी सुरू होण्याच्या काळात घडते. ही गोष्टदेखील श्रीमंतांचीच आहे. पण इथे वांशिक संघर्षात संपत्ती काम करत नाही, असा संदेश आहे. (मात्र, ‘तुमच्यापाशी पैशांचा विमा आहे, अशा आशयाचं विधान एकापेक्षा जास्त वेळा आहे!) यातलं एक विधान या चित्रपटाचंच नाही, तर संपूर्ण तमिळ-सिंहली भांडणाचंच मूळ जणू सांगून जातं. तमिळींच्या वर्तणुकीबद्दल एक सिंहली संतापाने म्हणतो, ‘मायनॉरिटी पीपल विथ ए मेजॉरिटी कॉम्प्लेक्स!’ अल्पसंख्यांक असूनसुद्धा बहुसंख्यांक असल्याची मिजास! बापरे! हे विधान संदर्भ बदलून आपल्या जातींचा बुजबुजाट असलेल्या देशात कुठे कुठे आणि कोणाकोणाला लावता येईल!

वूमन ऑफ द फोटोग्राफ्सजपानी आहे. चित्रपटीय भाषा खोलवर तपासणारा आहे. समाजाशी याचा काहीच संबंध नाही, असं नाही. पण जे समोर मांडलं जातं, ते व्यक्तीच्या संदर्भात मांडलं जातं. नातेसंबंध म्हणजे काय, माणूस स्वत:ची ओळख कशात शोधतो अशा प्रश्नांमध्ये हा चित्रपट शिरतो. जपानी असल्यामुळे सावकाश सरकतो. पण रेंगाळत नाही. प्रेक्षकाला मोकळा सोडत नाही. शब्दांपेक्षा गप्पपणा, अविर्भाव, दृष्टिकोन यांच्यावर जास्त विसंबणारा आहे. सामाजिक चित्रपट असा असत नाही. हा माणसाच्या अंतरंगात शिरणारा प्रयोगच आहे.

जनप्रवृतींवर एक शेरा मात्र यात सापडतो. यातल्या मुलीच्या फोटोंना (ती मॉडेल असते) सोशल मीडियावर पुष्कळलाइक्समिळत असल्याने तिला जाहिराती मिळू लागतात. त्यातून एका बाजूने कमाई होते आणि दुसरीकडून तिची अनेकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरण्याची भूकही भागते. पण नंतर लाइक्स कमी होतात आणि ती हवालदिल होते. पुढे जेव्हा जखम दाखवणाऱ्या फोटोंना पुन्हा लाइक्स मिळू लागतात, तेव्हा ती जखम बरीच होऊ देत नाही! इथे व्यक्तीच्या मनावर, मूल्यांवर समाज संस्कार करताना दिसतो.

एम्प्टी नेस्टहा चित्रपट चीनमधल्या एका मोठ्या शहरात घडतो. कित्येक वर्षांपासून एकटी रहाणारी आणि आता आत्महत्येचा विचार करू लागलेली म्हातारी बाई. हेल्थ प्रॉडक्ट्स विकायला आलेला एक तरुण सेल्समन लोचटपणे तिला चिकटतो आणि संबंध वाढवतो. पुढची कथा ओळखीच्या रस्त्याने जाते; पण अशी वळणं घेते की कंटाळा येत नाही. शेजाऱ्यांच्या निमित्ताने प्रेक्षकाला इतरांचं दर्शन होत रहातं; पण ते इतकं नेमकं, निवडक आहे की त्यातून समाजदर्शन होतं, असं म्हणवत नाही. अशा चित्रपटाच्या शेवटाविषयी सर्वसाधारणपणे दोनच पर्याय सुचतात; हा चित्रपट मात्र दोन्हींना खो देऊन, तरीही नीट संपतो. सकारात्मक शेवट करण्यासाठी नीतीला, सचोटीला मुरड घालण्याची गरज नाही, असं सांगून जातो!

महोत्सवातला सर्वोत्तम चित्रपट होता, इराणचानो चॉइस’. ही एकच कथा आहे; पण वेळोवेळी तिचं केंद्र तीन बायकांच्यात फिरतं. एक, अनाथ, रस्त्यावर रहाणारी, शरीरविक्री करणारी; दुसरी मानवी हक्कांच्या रक्षणासाठी इरेला पेटून काम करणारी पण विशाल चौकटीचा विचार न करणारी आणि तिसरी गरीब, नाडलेल्या बायकांबद्दल कणव वाटणारी आणि स्वत:च्या मूल्यांनुसार इतरांच्या बाबतीतही निर्णय घेणारी गायनॅकॉलोजिस्ट सर्जन. चौथं महत्त्वाचं पात्र आहे, ‘व्यवस्था’. चित्रपटात पुरुष आहेत; पण एक सोडल्यास बाकी सगळे बायकांच्या भूमिका स्पष्ट करण्याचं पूरक काम करणारे आहेत. चित्रपटाला वेग आहे: तो भावनांवरही थबकू देत नाही. एखाद्या डॉक्युमेंटरीप्रमाणे एकामागोमाग एक प्रसंग समोर येत रहातात आणि त्यावर चित्रपट काहीच शेरेबाजी जणू करत नाही. पार्श्वसंगीत तेवढं ताण निर्माण करत रहातं. मुख्य पात्रं जवळून दिसतात, बाकी सावल्या. किंवा पाठीकडून. चित्रपट निर्मम आहे आणि त्याचा शेवटही तसाच आहे; दिलासा न देणारा.

समस्याप्रधान. सामाजिक. चित्रपटमाध्यमामध्ये प्रयोग करणारा. हे प्रयोगसुद्धा असे की अनुभूतीच्या प्रक्रियेत बेरंग न व्हावा. नटनट्यांच्या अभिनयावर अवलंबून नसलेला, पूर्णपणे दिग्दर्शकाचा. चित्रपट या माध्यमाच्या शक्तीची चुणूक दाखवणारा. असा हा चित्रपट. अनेक अर्थांनी श्रेष्ठ.

यापलीकडे जाऊन या महोत्सवाचं एक वेगळं वैशिष्ट्य मला जाणवलं. मी पाहिलेल्या बावीस चित्रपटांमध्ये सात चित्रपटांमध्ये गे किंवा लिंगबदल केलेली किंवा लेस्बियन पात्रं होती! ही पात्रं किंवा त्यांचा इतर पात्रांशी असलेला नातेसंबंध, हा विषय या सातही चित्रपटांच्या केंद्रस्थानी होता, असं नाही; पण इतक्या मोठ्या संख्येने जेंडरसंबंधी मांडणी असणे, यातून काहीतरी अर्थ काढावासा वाटतो. ‘फनी बॉयहा दीपा मेहता दिग्दर्शित चित्रपट जेवढा ढोबळ आहे, तितकाच तरल, संवेदनशीलद लॉयरहा चित्रपट आहे. ‘द लॉयरमध्ये गे मित्रांचा एक अत्यंत नॉर्मल, ‘बुद्धिवादीग्रूप बघायला मिळतो. त्यातला कुणीच बायकी अविर्भाव करत नाही, एकमेकांत लघळ वागत-बोलत नाही; किंबहुना त्यांचे शब्द कळले नाहीत, तर त्यांना गे म्हणण्याचं कारण दिसणार नाही. त्यांच्या बोलण्यात एकमेकांची मस्करी आहे आणि त्यात गेपणातून येणाऱ्या वागण्याची मस्करीसुद्धा आहे. एकूण, गे असणं म्हणजे पूर्ण नॉर्मल असणं, असं जोरदार लॉजिक मांडून पटवण्यापेक्षा हे बघून जास्त पटावं!

एका ऑस्ट्रेलियन चित्रपटाचा उल्लेख राहिला. यात तर एक मुलगी लिंग बदलून पुरुष होते आणि गे होऊन तरुण पुरुषाच्या प्रेमात पडते! हे कळायला आणि मान्य व्हायला जरी कठीण असलं, तरी डेटवर जाताना तो चड्डीत कृत्रिम लिंग घालतो, हे रोचक वाटलं. या चित्रपटात, तसंच इतर चित्रपटांतसुद्धा या गे किंवा लेस्बियन किंवा लिंगबदल केलेल्या व्यक्तींविषयी इतर सुजाण नागरिकांची, त्यांच्या नातेवाइकांची प्रतिक्रिया धक्का बसल्याची होताना दिसत नाही. याला अपवादफनी बॉयमधलं आपल्याला परिचित असलेलं दक्षिण आशियाई कुटुंब.

भारतीय किंवा दक्षिण आशियाई कौटुंबिक वागण्याला भोंदू म्हणून सोडून दिलं, तर लॅटिन अमेरिकेपासून पश्चिम-पूर्व युरोपसकट ऑस्ट्रेलियापर्यंतएलजीबीटीक्यूलोकांची संख्या इतकी वाढली आहे का, की त्यांचं दर्शन इतक्या मोठ्या प्रमाणावर चित्रपटांमध्ये सर्वसाधारण माणसं म्हणून व्हावं? मला वाटतं, असं झालं असावं. हॉलिवुडपटांमध्ये आफ्रिकन अमेरिकन माणसं पूर्वी अर्कचित्रांसारखी असत. त्यांच्या वागण्याबोलण्यात त्यांना वेगळे ठरवणाऱ्या विशिष्ट लकबी दिसून येत. आता तसं राहिलं नाही. विल स्मिथ, डेन्झेल वॉशिंग्टन हे नट चित्रपटात पोलिसापासून, वैज्ञानिकासकट सज्जन माणसापर्यंत कोणीही असू शकतात. अमेरिकन समाजाने आता आफ्रिकन-अमेरिकनांचा सर्वसाधारण नागरीक म्हणून स्वीकार केला आहे, याचंच हे चिन्ह. तसंच एलजीबीटीक्यू लोकांबद्दल म्हणता येईल.

आपण यापासून खूप लांब आहोत. आपला समाज लांब आहे, आणि आपल्या चित्रपटांमध्येवेगळ्यालोकांचंनॉर्मलचित्रण होण्यापासूनही लांब.

 

Tuesday, April 13, 2021

पुणे फिल्म फेस्टिवल (भाग २)

 १२. टेल्स ऑफ द लॉकडाउन

या चित्रपटात कोविड, लॉकडाउन यांची स्पष्ट दखल आहे. लॉकडाउनमुळे वेगवेगळ्या लोकांच्या जीवनात काय प्रसंग ओढवले, याचं मुक्त चित्रण. पाच वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी सादर केलेले पाच स्वतंत्र एपिसोड्स. त्यांचा एकमेकांशी संबंध नाही. सगळ्यांचा लॉकडाउनशी संबंध आहे, हे समान सूत्र.

स्पॅनिश लोक फार बोलतात! आणि वेगाने बोलतात. बडबडणे हे त्यांचं अभिव्यक्तीचं मुख्य माध्यम असल्यासारखं वाटतं. आणि यात हिंसा अगदी मुक्तपणे व्यक्त होते. पहिल्या प्रकरणात एक बाई एका अपरिचिताच्या घरात घुसते आणि तुझ्या घरात दूषित, धोकादायक व्हाइब्ज जाणवताहेत, ते घालवण्यासाठी तू मी विकते आहे, ते घे आणि तसं कर,’ अशी त्याच्या गळ्यात पडू लागते. तो गळाला लागतो आहे, असं वाटल्यावर प्रीमियम व्हर्शन घे’, असं म्हणत बरेच पैसे मागते. ‘तू रहायला येण्यापूर्वी इथे एक खुनी रहायचा, त्याने इथेच केलेल्या खुनांमुळे इथलं वातावरण दूषित झालंय,’ असं म्हणते! आपल्याला वाटतं, तो फसतो की फसत नाही, ही चित्रपटाची गोष्ट असेल. तसं होत नाही. तो उत्तरतो, ‘मीच तो खुनी. सात खून केलेत इथे. नाही, आठ. एकाचं मांडीचं हाड इथेच कुठेतरी दडवलंय, ते विसरलोय. तुरुंगातून नुकताच सुटून आलोय!’ आता दचकण्याची तिची पाळी. पण ती सावरते. ‘मग तर तुला ही ट्रीटमेंट घ्यायलाच हवी!’ असा आग्रह करू लागते. सगळं दर्शन जणू विनोदनिर्मिती. वेगाने बोलणं आणि चपळ हालचाली यांच्यामुळे तर फार्सिकल.


पुढे असंच चालू रहातं
. एकजण बंदूक, चाकू चालवून माणूस मारायची तालीम करू लागतो. त्यात कुत्र्याला मारून टाकतो. बेमालूम हत्या कशी करावी, याची ऑनलाइन ट्यूशन घेत असतो. लागोपाठ दोन अशा कथा पाहिल्यावर तिसऱ्या गोष्टीत कधी हे माणूस मारण्याकडे वळणार,’ असं मनात येत रहातं. जे चाललंय, त्याचा अर्थ त्याच दिशेने लावत रहायला होतं. त्यात ते भराभरा बोलणारे स्पॅनिश लोक. मजेत मारत असतील, असंही वाटतं. पण यानंतर एकदम शेवटच्या गोष्टीत हिंसा येते. म्हणजे मारून टाकलेला पुरुष घरासमोर पार्सल म्हणून आणून पोचवला जातो. मग तिथल्या जोडप्यातली धीराची बाई त्या मुडद्याची विल्हेवाट लावण्याची महान युक्ती शोधते. ती साग्रसंगीत पहावी लागते. बापरे! आणि यात दिग्दर्शकीय नापसंती किंवा विरोधी शेरा अनुपस्थित.

यापासून भारतीय निर्माते-दिग्दर्शक योग्य धडे घेतील आणि आपल्याला या प्रकारचे देशी अवतार बघायला मिळतील, यात शंका नाही.

 १३. एम्प्टी नेस्ट

एकटी रहाणारी वयस्क बाई. अनेक वर्षांपासून एकटी. मुलगा दूर कुठेतरी नोकरी करतो आहे. तो चौकशीसाठी फोन करतो आणि तिला वृद्धाश्रमात जाण्याचा आग्रह करत रहातो. ही तशी स्वावलंबी आहे. लघवी कधी कधी आवरत नाही, इतकंच.

या लघवी आवरता न येण्याचा उपयोग चित्रपटात एकदाच होतो, घरी आलेल्या एका सेल्समनने तिथे पोछा मारून सलगीत एक पाऊल पुढे टाकलं, हे दाखवण्यासाठी. तो लोचटपणे येत रहातो पण नंतर दोघांचं बरं जमतं आणि ती त्याची वाट पाहू लागते. मुख्य पात्रं ही दोनच. त्यांच्या नातेसंबंधाची ही कहाणी शेवटी छान वळण घेते आणि जगण्याकडे सकारात्मक दृष्टी देऊन जाते. गोष्टीत जे घडत जातं, त्याचा सूर पहाता (आणि भारतीय फिक्शन, सिनेमा यांनी आपल्या मनाला लावलेल्या वळणामुळे) हा शेवट काहीसा अनपेक्षित आहे.


मी कथा सांगणार नाही. कारण या चित्रपटाचा सारांश चित्रपट पहाण्याअगोदरच समोर येतो, याविषयी माझी तक्रार आहे. कारण त्यात जे उघड केलं आहे, ते चित्रपटात बऱ्याच उशीरा बाहेर येतं. हे बरोबर नाही. चित्रपट (हे कुठल्याही कलेला लागू आहे) बघताना एकेका प्रसंगाचा ठसा प्रेक्षकाच्या मनावर उमटत जातो आणि मागच्या ठशावर पुढचा ठसा उमटत आस्वादाची प्रक्रिया पुढे सरकत जाते. जे नंतर कळतं, त्याचा ठसा अगोदरचे प्रसंग पहाताना मनावर असू नये, या स्पष्ट इराद्यानेच चित्रपटाच्या पटकथेत विशिष्ट घटनाक्रम योजलेला असतो. पात्राचं पूर्वायुष्य काय होतं, ही माहितीसुद्धा आशयाचाच भाग असते. ते अगोदर सांगून दिग्दर्शकाला अभिप्रेत असलेला आशय बिघडत नाही का? रहस्यपटाच्या आस्वादात खरा खुनी कोणहे माहीत असणे/नसणे यालाच काय ते महत्त्व असतं, असं नाही.

तरी हा रहस्यपट नसल्याने फार विरस होत नाही. गोष्ट (मेनलँड) चीनच्या एका मोठ्या शहरात घडते. गरीब माणसाला सुस्थितीत येण्यासाठी या समाजात किती अडचणी असतात, असा उल्लेख यात आहे. बरं वाटलं. कला, अभिव्यक्ती, सामाजिक मोकळेपणा यांवर बंधनं घालणाऱ्या चीनच्या साम्यवादी शासनाला हे चालतं. लहान मुद्दा आहे; पण लक्षात आला.

१४. माय फादर्स स्टोरीज

हा चित्रपट कलाकारांच्या अभिनयावर उभा आहे. त्याची कथा वेगळी, लक्षणीय आहेच; पण अभिनय बिघडला असता, तर चित्रपटाच्या आशयाने मार खाल्ला असता.


चित्रपटाला सुरुवात होते तेव्हा एक बाप त्याच्या शाळकरी मुलाला खूप काही रंगवून, वाढवून सांगत असल्याचं दिसतं. बापाचा चेहरा स्वत:च्या कथनात रंगलेला; तरीही कसनुसा. खूप हातवारे. मुलगा मुग्ध होऊन ऐकतो आहे.  असंच होत रहातं. वर्तमानात आसपास काहीतरी घडतं आणि बापाचं गोष्ट रंगवणं सुरू होते. प्रेक्षक म्हणून आपल्या लक्षात येतं की हा थापा मारतो आहे. पण हेसुद्धा कळतं की तो स्वत:लाच थापा मारत आहे. मुलाला मध्ये घालून काल्पनिक गोष्टींना जिवंत करू पहातो आहे. हा बाप एक काल्पनिक जग उभं करतो आणि त्यात मुलाला गुंतवतो. बाप शिझोफ्रेनिक नाही. वास्तव जरा हाताबाहेर जाऊ लागताच तो गृहितंच बदलू लागतो आणि जे काही चुकीचं किंवा त्रासदायक घडतंय, त्याची जबाबदारी इतरांवर टाकून मोकळा होतो. अर्थात जगात त्याची सत्ता मुलगा आणि बायको यांच्यावर चालत असल्याने सगळी चूक त्यांचीच ठरते.

हे बघणं भयंकर आहे. हे विनोदी ठरू शकतं पण तसं नाही. हे तेंडुलकरी आहे. छळवादी आहे. तसं प्रतीत होण्यासाठी बाप कसा दिसायला हवा? तो जगाला वेडा दिसता कामा नये. त्याच्या बायकोला तो पराकोटीचा दुबळा, कडेलोटाच्या सीमेवर असल्यासारखा भासतो आणि ती प्राणपणाने त्याचा बचाव करू बघते. कोणाकडे? अर्थात मुलाकडे! मुलगा? संस्कारशील वयातला मुलगा बाप जे स्वप्नवास्तव रंगवतो, त्यात खुशीने सामील होतो. पण केव्हातरी मुलाच्या अंगाशी येणार असतंच. मग त्याचं काय होतं? आई आणि बाप हे जेव्हा खऱ्या आणि मनातल्या विश्वाचे सर्वात भक्कम आधारस्तंभ असतात, त्या कोवळ्या वयातला मुलगा स्वत:ला, बापाला, जगाशी असलेल्या नातेसंबंधांना कसा सांभाळतो?

तो जेव्हा बापाची प्रतिमा बनू लागतो, तेव्हा खरी ट्रॅजेडी जाणवते. पण चित्रपट या दिशेने फार पुढे जात नाही. विषय गुंडाळून एकदम शेवटाकडे जातो. शेवट समंजस आहे; पण काळ जरी मोठी उडी घेत असला तरी पात्रांच्या मनोभूमिका तिथेच, ताच रहातात.

चित्रपट विशिष्ट स्थितीतल्या व्यक्तिरेखांचा आहे, असं जरी म्हणता येत असलं; तरी कुटुंब, संस्कार, दया-क्षमा यांचं रूपांतर दुर्गुणात कसं होतं, याचं जळजळीत दर्शन देतो. आणि म्हणून तो सर्वांनाच अभ्यसनीय आहे. जसे तेंडुलकर होते.

१५. लँड ऑफ द फरगॉटन

१९५१ साली इटलीत घडलेली गोष्ट. डोंगराळ भागातलं एक दुर्गम गाव. तिथे जायला रस्ता नाही. स्वत:ला गावाचा प्रमुख मानणारा एक गुंड प्रवृत्तीचा माणूस गावाचा विकास होऊ देत नाही. पुढाकार घेऊन गावासाठी काही करू बघणाऱ्या काहीशा शहाण्याची पुरुषाची तर त्याने बायकोच पळवलेली असते. डोंगराच्या खाली असलेल्यातालुक्याच्यागावचा प्रशासक गावकऱ्यांच्या विनंतीला मुळीच दाद देत नसतो. एका दुर्घटनेनंतर गावकरी स्वत: श्रमदानाने रस्ता बनवू लागतात. अर्थात त्याला त्या तथाकथित प्रमुखाचा आणि प्रशासनाचा विरोध होतो. वगैरे.


गोष्ट सुरू भलतीकडे होते. गावात नवी मास्तरीण  येते, तिच्या आगमनापासून. यातून प्रेक्षक आपोआप गावाकडे थोडं अलिप्तपणे बघतो. गावकऱ्यांची दु:खं बाहेरून दिसतात आणि परकी वाटता वाटता तिथूनखरीवाटतात. गावाचं वातावरण, गावकरी, मास्तरीण, ‘पोएटम्हणवणारा एक जण, घोड्यावरून येणारा गुंड यांची रूपं वास्तवदर्शी वाटतात. पण संस्कारशून्य मनाने बघणं शक्य होत नाही. ‘नया दौरआणि त्यातला भाबडा आदर्शवाद आठवतो. गांधी आणि त्यांच्या चळवळी आठवतात. ‘स्वदेससुद्धा आठवतो. या सगळ्या आठवण्यातूनलँड ऑफ द फरगॉटनपांगळा दिसू लागतो. त्यातल्या तपशिलांमधली विसंगती खटकू लागते. गावात शिक्षक ठरत नसताना मुलांना लिहिता वाचता कसं येत असतं? शेवटी जे होतं, त्यामागची प्रेरणा नीट कळत नाही: ते अगोदरच का होऊ शकत नव्हतं? मास्तरणीचं पात्र प्रेक्षकाचं प्रतिनिधित्व करतं, हे खरं; पण त्यापलीकडे तिचं काम काय?

असो. १९५१ सालल्या इटलीतल्या ग्रामीण भागात लोकांना गांधी माहीत नव्हते, इतकं मात्र कळलं.

१६.

स्टिचेस

आपल्याला मुलगा झाला आणि त्याचा जन्मत:च मृत्यू झाला, हे एका बाईला खरं वाटत नाही, कारण त्या अर्भकाच्या मृत्यूची नोंद नीट नसते, त्याच्या दफनाचीही नोंद नीट नसते. पण ती जिथे जिथे चौकशी करते, तिथे तिला एकच उत्तर मिळतं: मुलगा झाला आणि लगेच त्याचा मृत्यू झाला. तिचा नवरा, सगळं जगच या तिच्या दुर्भाग्याचा स्वीकार करतात; पण ती करत नाही. वेगवेगळ्या मार्गांनी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत रहाते. यात सगळे तिला एक हटवादी बाई म्हणून ओळखू लागतात.


असं ती १८ वर्षं करते! घरच्या स्थितीमुळे तिला कपडे शिवत रहावं लागतं, घरकामं चुकत नाहीत. पण तिच्या डोक्यात एकच विषय. जगण्याला असा एकच एक अर्थ लावून बसलेल्या व्यक्तीच्या निकटच्या लोकांना कसा आणि किती त्रास होत असेल? स्वत: तिच्या व्यक्तिमत्वाचं काय होत असेल?

अशा झपाटलेल्या व्यक्तिरेखा आपल्यासाठी अनोख्या नाहीत. ‘मेरे करन अर्जुन आयेंगेम्हणणारी राखी किंवाखुदा गवाहमध्येवो आयेगाम्हणत रहाणारी श्रीदेवी या दोघींपेक्षा जास्त परिचित आहेत त्या नवऱ्याच्या निधनानंतर सफेद साडी घालून फुलटायमर उदास आणि उदात्त झालेल्या हिरो किंवा हिरॉइनींच्या आया. पहिल्या दोघीसुद्धा फुलटायमरच आहेत. त्यांच्या जगण्याला दुसरं काही परिमाण नाही. तसं या बाईचं नाही. ती शरिराने या जगात आहे पण मनाने नाही. आणि जसे बाकीचे सगळे स्वत:च्या वागण्याला थोडी मुरड घालत तिला सांभाळून घेतात; तसंच तीसुद्धा मनातली तगमग तेवत ठेवून सामान्य व्यवहार सांभाळते. तिच्या हट्टीपणामुळे पोलिसांकडून, हॉस्पिटलातून, पालिका कार्यालयातून तक्रारी आल्या की त्यांचा जसा पारा चढतो; अगदी तसाच प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरं मिळू लागली की तिचा तोल जातो. एरवीची ही मुकी, दगडी चेहऱ्याची बाई प्रक्षोभक होऊन जाते.

हा अभिनय सोपा नाही. घरात-बाहेर काहीही करताना तिच्या हालचाली जशा हव्या तशाच असतात; पण तिच्या आत ज्वालामुखी धुमसतो आहे, असं सतत जाणवत रहातं. ‘आय नेव्हर क्रायया चित्रपटातल्याओलाचा अभिनय असाच भिडला होता; पण या Snezana Bogdanovic चा अभिनय एक पायरी वरचा वाटला. बाकी चित्रपटातले तपशील (तरुण मुलगी मोबाइल बघतच अंथरुणातून बाहेर येते!) वास्तवदर्शी वाटतात. उत्कंठा वाढवणाऱ्या, रहस्य निर्माण करणाऱ्या अशा चित्रपटांचा शेवट फार नाट्यपूर्ण तरी होतो, नाहीतर गुळमुळीतपणे विरून जातो. या चित्रपटात दोन्ही होत नाही. अठरा वर्षं मनात धरून ठेवलेल्याचा निचरा होण्याची प्रोसेस काय असेल, यावर अनेक मतं असू शकतात; चित्रपट जे दाखवतो, ते त्यातलं एक. मला ते पटलं.

१७. इन्टू द डार्कनेस

दुसऱ्या महायुद्धातल्या पर्ल हार्बरवरच्या जपानी हल्ल्यासारख्या, नॉर्मंडीवर प्रथम पाऊल टाकलेल्या दिवसासारख्या विशाल पट असणाऱ्या घटनांवर चित्रपट येऊन गेले. जगभर कुठे कुठे लढलं गेलं, म्हणून तेमहायुद्ध’. त्यामुळे आफ्रिकेतल्या वाळवंटापासून, आग्नेय आशियातल्या गवताळ जंगलांसकट आणि सागरी लाटांसकट युरोपातल्या मोठ्या शहरांपर्यंत अनेक जागी झालेल्या लढाया, डावपेच, कटकारस्थानं, वगैरेंचंही चित्रण झालं. शौर्य दाखवून झाल्यावर ज्यूंचा वंशसंहार आला. त्यानंतर अलीकडच्या काळात युद्धामध्ये दिसून आलेल्या मानवी भावभावना बघायला मिळाल्या. यात दोन गोष्टी बाकी होत्या; एक, जर्मन दृष्टिकोन आणि दोन, या वा त्या बाजूने लढण्याची वेळच न आलेल्या, जर्मनीला निमूट शरण गेलेल्या राष्ट्रांमधलं वातावरण. ‘इन्टू द डार्कनेसहा चित्रपट जर्मनीने पादाक्रांत केलेल्या डेन्मार्कची कहाणी सांगतो.


ही कहाणी आपल्याला एका उद्योगपतीच्या घरातून बघायला मिळते. घर मोठं आहे. एक मुलगा डेन्मार्कच्या निमसैनिकी दलात भरती होतो. दुसरा काहीसा भावनिक असतो आणि कसल्या कसल्या भानगडीत, भूमिगतांच्या गटात अडकत जातो. बहीण चक्क जर्मन अधिकाऱ्याच्या प्रेमात पडते आणि लग्न करते. उद्योगधंद्याचं  आणि त्याबरोबर सर्व कामगारांचं भवितव्य जर्मन प्रशासकांकडून येणारा दबाव आणि त्याला प्रतिरोध करण्याच्या इच्छेची वास्तवातली अभिव्यक्ती, यांच्यातल्या खेचाखेचीमधून ठरणार असतं. शिवाय इतर उद्योजक काय करतात, त्याचा दबाव असतोच. कर्तव्य, व्यवहार, धोरणीपणा यांचे अर्थ सदा रंग बदलत असतात.

[यात एक रोचक संवाद आहे, तो असा: तो जर्मनांबरोबर सहकार्य करतो म्हणून बायको त्याला नावं ठेवू लागते, तेव्हा तो उत्तरतो, ‘तुझ्या बापासारखी माझी संपत्ती वडिलोपार्जित नाही. ती कामातून निर्माण झालेली आहे. त्या कामाशी बांधील रहाणे, कामगारांच्या भल्याबुऱ्याची जबाबदारी घेणे मी टाळू शकत नाही!’ हा मनुष्य गरिबीतून वर आलेला तर आहेच; पण श्रीमंतांमध्येसुद्धा गर्भश्रीमंत आणि कष्टसाध्य श्रीमंती यांच्यात भेद असतो, असं हा चित्रपट सांगतो. यातून पुढे असं सुचतं, की पिढ्यानपिढ्या सत्ता-श्रीमंती (वा अन्य कोणत्यारूपी श्रेष्ठत्व) भोगलेल्याला राष्ट्रप्रेम बाळगण्याची हौस करता येते, कारण स्वत:ची शक्ती कालातीत असल्याची भावना त्याच्या अंतरी वास करत असते. उद्योग उभारून वा कामगार होऊन पैसे कमावणाऱ्याला वर्तमानाचं भान ठेवावंच लागतं! टागोरांच्या कथेवर सत्यजित राय यांनी काढलेल्याघरे बायरेची आठवण आली. संदर्भ थोडा वेगळा आहे, काहीसा उलटादेखील आहे; पण वाद समांतर आहे.]

जर्मन आक्रमणामुळे गंडांतर आलेले दोन गट: एक धार्मिक, म्हणजे ज्यू आणि दुसरा तात्त्विक, म्हणजे कम्युनिस्ट. ज्यू पळून जातात, लपून बसतात; कम्युनिस्ट अर्थातच छुपा प्रतिकार करतात. हे सगळं होत असताना सर्वसामान्य व्यवहार चालूच असतात. जर्मन प्रभावाखाली त्यांचंही काहीतरी होऊ लागतं. चित्रपट असं बरंच काही दाखवतो. त्यात भर म्हणून नुसती स्थिती न दाखवता तो स्थित्यंतरसुद्धा दाखवू बघतो. परिणामी लांबतो. आणि ठोस विधान न करता संपतो.

आता एखाद्या इंग्लिश वा अमेरिकन चित्रपटात जर्मन दृष्टिकोनसुद्धा बघायला मिळण्याची प्रतीक्षा करूया!

१८. ऑल द डेड वन्स

हा चित्रपट एकापेक्षा जास्त पातळ्यांवर वावरतो. घरात एक म्हातारी आई आणि तिच्या दोन मुली आहेत. एक पियानो वाजवते आणि शून्यात बघत असते, दुसरी नन झाली आहे. म्हातारी मृत्यूला हूल देत चिवटपणे आणि कधी विकल तर कधी उत्साही, अशी जगण्याला धरून बसली आहे.

घर मोठं आहे, वाडाच आहे. हे लोक एकेकाळी जमीनदार होते, पदरी गुलाम बाळगून होते. आता गुलामगिरी संपली आहे; पण गेली आहे का? पूर्वाश्रमीचे गुलाम स्वत:ला बजावत आहेत की गुलामगिरी गेली आहे; तर दुसरीकडे जुन्या मालकांच्या हाडांमध्ये मुरलेल्या सवयी जात नाहीत. म्हणजे, ते वाडावासी नोकरांना गुलामाप्रमाणे वागवतात, असं नाही; पण आपोआपच नोकरांकडून विशिष्ट वागणुकीची, एक प्रकारच्याअनुशासन पालनाची अपेक्षा धरतात. ‘मालकासारखे वावरतात.


घरातल्या तिघींच्या तीन तऱ्हा आहेत. एकटेपणा तिघींना घेरून आहे. म्हातारी सरंजामी अविर्भावात राहू बघते. बहिणींपैकी एकीला आसपास मृत लोक वावरत असल्याचे भास होतात. जोगिणीचं मन तरी कुठे स्वस्थ आहे?

देश ब्राझील. घरातली जुनी नोकराणी मरते आणि तिला जे येत असतं, कळत असतं; ते नवीन कोणाला जमत नाही. बारीक सारीक घर्षण होत रहातं. नोकर अर्थात काळे आणि मालक गोरे. भ्रमात रहाणारी बहीण एकदा काळ्या नोकराणीला तिच्या टोळीतले विधी करायला सांगते. त्यासाठी दुसऱ्या एका काळ्या बाईला मदतीला घेण्याची सूचना करते. सगळे काळे आफ्रिकेतून आले, तर त्यांचे विधी सारखेच असणार, असं गोरीला वाटतं; तरआफ्रिका खूप मोठी आहे!’ असं नोकराणीला वाटतं. यात पुन्हा गोरे आणि काळे यांच्या भूमिका एकपदरी नाहीत. एक वर्ग पिळवणूक करणारा आणि दुसरा पिळला जाणारा, असं सरसकट म्हणता येत नाही. बाहेरही काहीबाही होत असतं. त्याचे पडसाद घरात उमटतात.

अशा चित्रपटाचा प्रवास संथच असणार. या बायकांच्या जगात पुरुष कधी मधी येतात; पण ते बायकांच्याच संदर्भात. कुठल्या पुरुषाची स्वतंत्र कहाणी सुरू होत नाही. या सर्रियल वातावरणात ना व्यक्तिरेखा सुस्पष्ट अवतरतात, ना नातेसंबंध ठळक जाणवतात. शेवटी तरमेलेले खरंच आसपास फिरत असतात की काय!’ असा संभ्रम निर्माण केला जातो.

हा चित्रपट घडणाऱ्या गोष्टीपेक्षा वातावरणाचा, एकमेकांशी लगट करणाऱ्या व्यक्तिरेखांचा आहे. आणि तसं त्याकडे बघितलं, तर रोचकही आहे.

१९. क्वो वादिस, आयदा?

युरोप म्हणजे फ्रान्स, जर्मनी, इटली आणि काहींच्या मते ब्रिटनसुद्धा. पण युरोपच्या पूर्वेकडच्या देशांची आपल्याला फार कमी माहिती असते. सोविएत युनियनच्या वाताहातीनंतर पूर्व युरोपातल्या कम्युनिस्ट राजवटी धडाधड कोसळल्या, इतपत माहिती बऱ्याच जणांना असते; पण युगोस्लाविया आणि आसपास या प्रदेशातल्या राष्ट्रांचं बाल्कनायझेशन होताना, म्हणजे तुकडे पडताना नेमकं काय झालं, हे फारच थोड्या लोकांना माहीत असतं. जॉन ल कारे या ब्रिटीश कादंबरीकाराच्या काही कादंबऱ्या तिथे घडतात. फार कडवट आहेत. हिटलरच्या जर्मनीने ज्यूंवर केलेले अत्याचार आणि इस्रायलने पॅलेस्टाइनची केलेली स्थिती यांच्या पुढे जाणारा हिंसाचार तिथे कसा घडला, याच्या कहाण्यांना युरोप-अमेरिकेच्या पत्रकारितेनेसुद्धा फार प्रसिद्धी दिलेली नाही. तिथल्या हत्याकांडात पडलेले बळी बहुतांश मुसलमान होते, हे एक कारण असू शकेल.


हा चित्रपट सर्बियातल्या एका गावात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. सर्ब सैनिकांचा हल्ला येऊ घातला असताना गावाच्या संरक्षणाची जबाबदारी यूनोच्या सशस्त्र दलावर पडते आणि पुढे काय होतं, याची ही कहाणी. यूनो सैन्यदलासाठी दुभाषी म्हणून काम करणारी असते तिथल्या शाळेत इंग्रजी शिकवणारी आयदा. जीव वाचवण्यासाठी घरदार सोडून पळणाऱ्या लोकांच्यात तिचा नवरा व दोन मुलगेसुद्धा असतात. तिला यूनोच्या अधिकाऱ्यांबरोबर सतत रहावं लागतं. आपलं संरक्षण करणाऱ्या सैन्याच्या अधिकाऱ्यांशी तिची जवळीक पाहून सगळे नागरीक आपली गाऱ्हाणी तिलाच सांगू बघतात. लोकांच्या वतीने ती यूनोच्या अधिकाऱ्याला विचारते, सर्ब सैन्य गावात शिरलं तर? त्यांनी हिंसाचार सुरू केला तर? तुम्ही काय कराल? तो उत्तर देतो, असं होणार नाही. यूनोचं विमानदल येणार आहे. विमानं येत नाहीत; पण सर्ब सैनिक येतात. सर्व नागरीक सुरक्षित रहातील, असं आश्वासन यूनोवाले देत रहातात; पण नागरिकांना सर्ब सैनिकांच्या हवाली करणं त्यांना भाग पडतं.

आपलं काय होणार आहे, याची त्या लोकांना कल्पना असते. आयदालाही असते. गोष्टी अगदी टोकाला पोचतात, तशी ती स्वत:च्या कुटुंबाला वाचवण्याचा जीव तोडून प्रयत्न करते. ती स्वत: यूनोची कर्मचारी असल्याने तिला धोका नसतो; मात्र स्वत:च्या कुटुंबाची शाश्वती ती देऊ शकत नाही.

होऊ घातलेल्या नरसंहाराची पार्श्वभूमी चित्रपटाला आहे, असं म्हणता येईल. आयदाची धावपळ, तिची घालमेल, कुटुंबाला वाचवण्यासाठी तिचा आकांत, यांची, म्हणजे एक प्रकारे आयदा या व्यक्तीच्या हितसंबंधांची ही कहाणी आहे, असंही म्हणता येईल. पण ते चूक ठरेल. चित्रपटाच्या प्रेक्षकांसाठी ती लोकांची प्रतिनिधी होऊन जाते. यूनोचे कर्मचारी सोडल्यास तिथे सर्वात जास्त सत्ता आयदामध्ये वसत असल्याचं दिसत रहातं. आणि तिची असहाय्यता, तिचे भोग यांच्या रूपाने साऱ्या गावावरच्या प्राणसंकटाची आणि एक पायरी पुढे जाऊन सर्बियाला नको असलेल्या सर्व माणसांची कैफियत आपल्यासमोर मांडली जाते. समूहाऐवजी व्यक्तीची कहाणी आपोआपच जास्त भिडते. युद्धकथा आणि हा चित्रपट यांच्यात आणखी एक मोठा फरक आहे. इथे शत्रूला रूप आहे. एक सर्बियन सैनिक आयदाचा विद्यार्थी असतो पण म्हणून त्याच्या ठायी दया जागत नाही.

चित्रपटाच्या शेवटी गावापासून तुटलेली आयदा पुन्हा तिथे जाते. शाळेतल्या लहान मुलांना पुन्हा एकदा एकत्र खेळताना बघते. तिच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेची चाहूल उमटते. गावात सुरू झालेल्या हलकल्लोळापासून सुरू झालेला चित्रपट शांत, निर्मळ वातावरणात संपतो.

पण ही शांतता खरी वाटत नाही. ‘संपले ते भयानक दिवसअसं आयदाला वा कोणालाही पटलं असेल, असं वाटत नाही. हा शेवट कृत्रिम वाटत रहातो.

२०. इनहेल एक्झहेल

जॉर्जिया. रशियाच्या पश्चिमेकडचा देश. पूर्व युरोप असला, तरी युरोपच. तरी तिथल्या बाईचं घरातलं, समाजातलं स्थान इतकं परिचयाचं?

चित्रपट सुरू होतो तो शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर येणाऱ्या इरिनाला नवरा घरी परत नेतो, इथे. ‘घरात शिरताना चेहऱ्यावर जरा स्मित असू दे,’ असं तिला तो बजावतो. ती तशीच दिसत असते, निर्विकार, उदास, अलिप्त. घर सामान्य. तिच्या स्वागतासाठी सगळे जमलेले. दीर, जाऊ, सासू, मुलगी, ... ते वातावरण हलकं फुलकं करण्याचा प्रयत्न करतात, ती फारशी दाद देत नाही.

पुढेही तिला घरात तुटकच वागणूक मिळते. मुलगी फोनवर मैत्रिणीलाआई ग्रीसहून परत आली आहे,’ असं सांगते. का, विचारल्यावर उलट प्रश्न येतो, ‘मग काय ड्रग डीलर म्हणून तुरुंगात होती, असं सांगू?’ नवरा, मुलगी आपापल्या जगण्यात पूर्ण मग्न असतात, सासूही तिला विचारत नाही. मुलगा तर अगदीच लहान असतो. घरात तिला माया, ऊब राहू दे; स्वस्थतासुद्धा मिळत नाही. तिच्या घोर त्यागाची दखल नवरा घेत नाही, उलटकुटुंबासाठी तुलाच बोल लावणं भाग होतं मला,’ असं ऐकवतो.


नियतीसुद्धा जणू तिच्या विरुद्ध असते. तुरुंगात तिच्या बरोबर असलेल्या एकीला दुर्धर व्याधी असते. तिची चिठ्ठी तिच्या मुलाला देण्याच्या निमित्ताने तिची त्याची भेट होते आणि जवळीकही होऊ लागते. तो गे असण्याने तिला काहीच फरक पडत नसतो. पुनर्वसनाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून ती योगाच्या वर्गाला जाते. तिथे आसनांपेक्षामनाला स्वीकारा, इच्छांना नाकारू नका,’ असा, एक प्रकारे शरीर-मनाला नियंत्रित करण्याच्या मार्गाच्या विपरीत संदेश दिला जातो. प्रयत्न करूनही तिला कुठेही आसरा मिळत नाही. शेवटी जेव्हा गे मित्राचा हिंसक मृत्यू घडतो, तेव्हा तिचं मन या जगापासून पूर्ण उबगतं.

ही बाई पूर्ण अबोल आहे. हडकुळी आहे. पण करारी दिसते. साध्या गृहिणीने तुरुंगात काही काळ घालवल्यावर तिचं असंच होईल, असं वाटतं. तिच्या वर्तनात चंचलता, आशंका दिसत नाही. योगाच्या वर्गात ती शेवटी जे करते, तेसुद्धा चुकीचं वाटत नाही. पण तिच्या दु:खांतिकेत नियतीचा मोठा हात असल्याचं मात्र वाटत रहातं

२१. अनसाउंड

बहिऱ्यामुक्यांची कहाणी!

हे शीर्षक जसंस्मार्टआहे, तसाच चित्रपटसुद्धा प्रामाणिक मांडणीपेक्षा स्मार्टपणाकडे झुकलेला आहे.


बहिऱ्या तरुणांसाठी डान्सक्लब चालवणारा फिन. त्यांच्या बहिरेपणामुळे संगीताचा व्हॉल्यूम अंमळ जास्तच मोठा ठेवला जातो आणि शेजारी पाजारी बिघडतात. नोहा. हा गिटारिस्ट. नीट वाव मिळत नाही, असं वाटून म्युझिक ग्रूप सोडतो. ही फिन आणि नोहा यांची गोष्ट.

गोष्टीत दम नाही. ती सांगत नाही. त्यापेक्षा दुसरं सांगतो. चित्रपटभर पार्श्वसंगीत वाजत रहातं. पात्रांमध्ये मुक्यांची संख्या मोठी असल्याने संवाद कमी. हातांच्या खुणा करत होणाऱ्या संवादांसाठी आपोआपच मागे संगीत वाजण्याची गरज निर्माण होते. पण इथे बोलक्या लोकांच्या दृश्यांमध्येदेखील मागे संगीत वाजत रहातं. ते काहीसं जादा होतं.

पण निसर्गातले, माणसांच्या जगातले बारीक बारीक आवाज चांगले टिपले आहेत. एरवी जिथे आपलं लक्ष जात नाही, तिथे मुद्दाम कान करायला लावला आहे, असं वाटतं. याचबरोबर स्पर्शाची भाषासुद्धा नजरेस आणून दिली आहे. जे शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही, त्यासाठी स्पर्श काम करू शकतो, हे दिसतं.

ऑस्ट्रेलियातसुद्धा रात्रीच्या टिटव्या ओरडतात, हे ज्ञान झालं.

यातला फिन हा मुळात मुलगी असतो. लिंगबदल करून घेऊन मुलगा झालेला असतो. हे तो अजिबात लपवत नाही. पण पुढे नोहाच्या प्रेमात पडतो! मुलीने लिंगबदल करून मुलगा व्हायचं आणि होमोसेक्शुअल होऊन मुलग्याच्याच प्रेमात पडायचं, ही कॉन्सेप्ट जरा अवघड वाटते.

असो. पण फिन जेव्हा डेटवर निघतो, तेव्हा चड्डीच्या आत कृत्रिम शिस्न चढवून बाहेर पडतो, हे मजेदार वाटलं. डेटवर रात्र होते. दोघे समुद्रावर जातात. नोहा सगळे कपडे उतरवून पाण्यात उतरतो. तिथे मात्र फिन चेहरा पाडून वाळूत बसून रहातो. कारण त्याला नागडं होता येणार नसतं!

जरा गुंतागुंतीचंच आहे हे प्रकरण.

२२. नो चॉइस

या इराणी चित्रपटाचं मूळ नाव आहे, मजबुरी. मजबुरीचा सगळा आशय नाइलाजमध्येदेखील येत नाही; ‘नो चॉइसतर अगदीच कमी पडतं, असं वाटतं. पण भाषांतरात आशय नाही तरी अर्थ बरोबर आला आहे.

पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये मी पाहिलेला हा सर्वोत्तम चित्रपट.

एक बेवारशी १६ वर्षांची मुलगी. फूटपाथवर झोपणारी. अकरा-बाराव्या वर्षापासून कोणासाठी तरी मुलं जन्माला घालणे, हा तिचा पोटापाण्याचा व्यवसाय. पण हे इराण आहे, तिला सरोगेट मदरअसलं काही नामाभिधान नाही. सिनेमाच्या सुरुवातीला तिचा यार तिला एका कुळाकडे नेतो. तो मध्यमवयीन पुरुष तिला सांगू बघतो की मी नीट शादीशुदा आहे, मला बायकोबरोबरच रहायचं आहे; पण तिला मूल होत नाही!महिनाभर एकत्र काढून ती गरोदर रहात नाही म्हणून हा पुरुष तिच्या याराकडे तक्रार करतो. या निमित्ताने यार तिला हॉस्पिटलात नेतो आणि तिथल्या तपासणीत कळतं की तिच्या ट्यूबला गाठ मारण्यात आली असून ती पुन्हा गरोदर राहू शकणार नाही!

इथून एक चमत्कारिक प्रवास सुरू होतो. तिला, तिच्या याराला हॉस्पिटलात वा इतर कुठे कोणी धूप घालत नाही. एक समाजकार्यकर्ती तिला मानवी अधिकारांवर काम करणाऱ्या एका तरुण वकील बाईकडे नेते. ती वकील बाई या मुलीला तिचा अधिकार नाकारणाऱ्याला (किंवा नाकारणारीला) कोर्टासमोर उभं करून मुलीला न्याय मिळवून देण्याच्या इरेला पडते. त्यात खूप धक्के खाते. वाटेत मुलीचं ऑपरेशन करणारी गायनॅकॉलिजिस्ट डॉक्टरीण आडवी येते. दोघींचा संघर्ष होण्याला नाईलाज असतो.

नाईलाज प्रत्येकाचा असतो. त्या मुलीचा, वकील बाईचा, डॉक्टरीण बाईचा; अगदी त्या याराचासुद्धा. प्रत्येक जण व्यवस्थेने सोपवलेलं आपापलं काम-कर्तव्य करण्याच्या मागे असतात. निरक्षर मुलगी जगण्यासाठी या धारेला लागलेली असते. याराला म्हणते, आता पुरे! मला फक्त तुझ्याबरोबर रहायचं आहे. तो म्हणतो, आणि खायचं काय? हे नवं गिऱ्हाइक पैसेवालं आहे. हे काम शेवटचं. मग आपण सुखाने एकत्र राहू. वकील मुलगी म्हणते, मूल होऊ द्यायचं की द्यायचं नाही, हा सर्वस्वी त्या मुलीचा अधिकार आहे. दुसरं कुणी काय म्हणून तिच्या वतीने निर्णय घेणार? हा अन्याय आहे. डॉक्टरणीचा नवरा, मुलगा कधीच परदेशी (अमेरिका?) जाऊन पोचलेले असतात आणि तिला लवकर येण्याची गळ घालत असतात. ती द्विधा मनस्थितीत असते. कामात पूर्ण बुडालेली असते. गरीब बायकांना पदरचे पैसे खर्च करून मदत करत असते. याराला परिस्थितीने गुन्हेगार केलेलं असतं. मग कोणीतरी लिहिलेला कायदा धाब्यावर बसवून तो समाजाला जे हवंय, ते देण्याची सेवापुरवत असतो. पुरुष म्हणून वाटाघाटी करणे, बाळाची नेआण करणे, पैसे देणे-घेणे हे व्यवहार तो सांभाळतो; पण मूल जन्माला घालण्यासाठी एक गर्भाशयच लागतं. ते ती मुलगी पुरवते. सगळे कसे छान एका जगड्व्याळ चक्रात अडकून आपापली जागा सांभाळत रहातात.

वकील बाई आणि डॉक्टरीण, दोघींच्या परिचयात मदत करणारे, आधार देणारे सहृदय पुरुष असतात जसा त्या मुलीला यार असतो, तसेच एक प्रकारे. तो यारही तिचं लैंगिक शोषण करत असतोच, असं नाही. आणि मुलगीही स्वखुशीने तो सांगेल ते करत असते.

मग या अमानुष स्थितीचा खलनायक कोण? हे असं होतंय, तीन्ही बायका जीव तोडून कष्टताहेत आणि कोणीच सुखी, समाधानी नाही; याला जबाबदार कोण?

याचं उत्तर आहे, व्यवस्था. पुरुषप्रधान व्यवस्था. चित्रपटात हे फार चांगल्या रीतीने सुचवलं आहे. सगळ्या पुरुषांचे चेहरे समोर येतात; फक्त व्यवस्थेच्या वतीने बोलणी करणारे पाठमोरे दिसतात. हॉस्पिटलात ताटकळणाऱ्या, सहन करत बसलेल्या बायकांच्या समोरून, आजूबाजूने खूप वर्दळ असते; पण बिनचेहऱ्याची. कधी तर नुसत्या सावल्याच घाईघाईत इथून तिथे जाताना दिसतात. व्यवस्थेला चेहरा नाही.

चित्रपटाला वेग आहे. कोणाच्याही दु:खावर, अडचणीवर, संकटावर चित्रपट रेंगाळत नाही. चित्रपट मूकही आहे. यातलं काहीही तो अधोरेखित करत नाही. एखादा पुरुष एखाद्या बाईला व्यवहार शिकवतो, ‘अगोदर स्वत:ची कातडी बचाव,’ असे सल्ले देतो; पण त्या क्षणावर चित्रपट थबकत नाही.

कॅमेरा सतत हलत रहातो. घाईच करतो. एकेका पात्राला जवळून न्याहाळतो; तसंच दूर होऊन गर्दीसुद्धा दाखवतो. पण या दोन गोष्टी एकत्र होत नाहीत. दुरून दिसणाऱ्या, विशाल चौकटीत ओळखीचं पात्र क्वचित दिसतं. एक व्यक्ती आणि सगळे मिळून व्यवस्था, मिसळत नाहीत; वेगळेच रहातात.

चित्रपटाचं पार्श्वसंगीत तेवढं बोलकंआहे. ते आघाती आहे. जे चाललं आहे, त्याबद्दल नापसंती व्यक्त करणारं आहे. आणि ही एकमेव गोष्ट सोडल्यास चित्रपट भावनेला अजिबात थारा देत नाही! प्रेक्षकाच्या विश्लेषक बुद्धीला आवाहन होत रहातं; पण भावनेच्या आहारी जाऊन कोणाची बाजू घेण्याची संधी चित्रपट नाकारत रहातो. मानेवर सुरा फिरून एक बाई मरते, तेव्हा ती अनामिकच रहाते. कुणीतरी जसा तिचा चष्मा पळवतं, तसंच आणखी कुणी तिच्यावर पांघरूण पसरतं. आणि मग त्या कापडावर येणारे जाणारे नाणी टाकत जातात. एकाचंही दर्शन न होता.

सुन्न करणारा, अंतर्मुख करणारा, व्यवस्था नामक बहुतोंडी आणि बिनओळखीच्या प्राण्याची भयंकर दहशत घालणारा अनुभव.